Mumbai Borivali Gold Chain Snatching Crime News Saam Tv
क्राईम

Mumbai Crime : आजीबाई देवदर्शनाला निघाल्या, पण चोरट्यांनी दुचाकीवरून सोन्याच्या साखळीवर मारला डल्ला, मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Borivali Gold Chain Snatching Crime News : मुंबईच्या बोरीवलीत ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावणाऱ्या आरोपींना एमएचबी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. आरोपींकडून २५ ग्रॅम सोनसाखळी जप्त करण्यात आली.

Alisha Khedekar

  • अय्यप्पा मंदिराजवळ ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावली

  • ऑटो रिक्षातून पळ काढणाऱ्या आरोपींचा सीसीटीव्हीमधून शोध

  • एमएचबी पोलिसांची झटपट कारवाई; २४ तासांत अटक

  • आरोपींकडून २५ ग्रॅम सोनसाखळी जप्त

संजय गडदे, मुंबई

मुंबईच्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना बोरीवली पश्चिमेतील एलआयसी कॉलनी परिसरात असलेल्या अय्यप्पा मंदिराच्या गेटजवळ घडली आहे. सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला एमएचबी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे २५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष विमलनारायण धनवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी रोजी सायंकाळी ७.४० वाजता ७० वर्षीय वसंती अय्यर या अय्यप्पा स्वामी मंदिरात दर्शनासाठी जात असताना, मंदिराच्या गेटमध्ये प्रवेश करताच पाठीमागून आलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली व काही अंतरावर उभ्या असलेल्या ऑटो रिक्षातून फरार झाला.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०३५/२०२६, बीएनएस कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपींनी ऑटो रिक्षाच्या नंबर प्लेटवर ग्रीस लावून ओळख लपवण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गठित तपास पथकाने ऑटो रिक्षा चालक राजनारायण छोटेलाल शर्मा (३५) याला दहिसर पूर्व येथील ज्ञानेश्वर नगरमधून अटक केली. त्याच्या चौकशीनंतर संजीव मुरलीधर गुप्ता (४३) यालाही अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीची २५ ग्रॅम सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५० पर्यंत अंक मोजता येईना, बापाचं डोकं सटकलंं, रागाच्या भरात लेकीला मार-मार मारलं अन्....

WhatsApp Update: QR कोड आणि 6 डिजिट PIN; आता मुलांच्या WhatsAppवर राहील पालकांची नजर; मेटानं आणलं नवं फीचर

Date Benefits: दररोज दोन खजूर खाल्ल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Vastu Tips: घरात सतत पैशांची चणचण भासतेय? मग या 5 वास्तू टिप्स नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: अमरावती जिल्हा नियोजनमधील अखर्चित निधीवरून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

SCROLL FOR NEXT