Crime News Yandex
क्राईम

Crime News: खळबळजनक! महिनाभर बेपत्ता, खाडीत सापडला 12 वर्षाच्या मुलाचा शीर नसलेला मृतदेह

Mumbai Cops Find Headless Body: मुंबईतील वडाळा भागात पोलिसांना एक शीर नसलेला मृतदेह सापडला आहे. यामुळे वडाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

Rohini Gudaghe

Mumbai Crime Updates

महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या १२ वर्षीय मुलाचा शीर नसलेला मृतदेह सापडल्याने वडाळा परिसरात खळबळ उडाली आहे. वडाळ्याच्या शांतीनगर भागात संदीप उर्फ राज यादव याचा मृतदेह सापडला आहे. तो २८ जानेवारीपासून बेपत्ता (Boy Missing For Month) होता. महिनाभरानंतर या मुलाचा मृतदेह सापडला आहे. वडिलांनी चपलांवरून मुलाचा मृतदेह ओळखल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  (Latest Crime News)

या मुलाचं डोकं धडापासून वेगळं करण्यात आल्याचं समोर येताच वडाळा टीटी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या अज्ञात इसमाविरोधात हत्या आणि अपहरणाचा गुन्हा नोंद नोंदविण्यात आला आहे. वडाळा (Wadala) ट्रक टर्मिनलजवळील एका खाडीत हा मृतदेह सापडल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मच्छिमाराला मृतदेह सापडला

वडाळा टीटी पोलिसांनी मंगळवारी संदिप उर्फ ​​राज यादव या मृत मुलाचा मृतदेह मच्छिमाराला आढळल्यानंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. (Crime News) आरोपी पळून गेल्यावर प्रभारी पोलीस अधिकाऱ्याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. शर्ट, हातातले कडे आणि चपलेमुळे या मुलाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलं आहे.

मंगळवारी खारफुटीमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका स्थानिक मच्छिमाराला जाहिरात बॅनरच्या फेकलेल्या रोलमधून एक हात बाहेर पडलेला दिसला. त्याने ताबडतोब पोलिसांना सूचित केलं. त्यानंतर त्यांनी हा बॅनर रोल उघडला. यामध्ये त्यांना एका मुलाचा अत्यंत कुजलेला डोके नसलेला मृतदेह (Mumbai Cops Find Headless Body) आढळला. त्यांना एक कवटीही सापडली आहे. ती मुलाची असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टम आणि डीएनए चाचणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी मुलाच्या वडिलांनी वडाळा पोलिसांत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. रात्री बाहेर खेळायला गेल्यानंतर मुलगा परतला (Mumbai Crime News) नाही. मुलाचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडला नाही, अशी माहिती पोलिसांना मृत मुलाच्या वडिलांनी दिली आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्यांना संदिप हा त्याचा शेजारी पश्चिम बंगालचा रहिवासी असलेल्या बिपुल सिगरीसोबत फिरताना आढळला. दुसऱ्या दिवशी, स्थानिकांनी बिपुलला (Mumbai Crime Updates) पकडलं. त्याला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीदरम्यान बिपुलने पोलिसांना सांगितलं की, रक्तस्त्राव होत असल्याने डोकं धुवायचं आहे. या बहाण्याने तो स्टेशनच्या बाहेर पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती मिळतेय. शहर गुन्हे शाखेने संशयित आरोपीचा पुणे, दिल्ली आणि नंतर जम्मू-काश्मीरमध्ये माग काढला, परंतु तो सापडला नाही. प्राथमिक चौकशीत बिपुलने किरकोळ चोरी केल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT