Crime News  Saam Tv
क्राईम

Crime News : बायकोची पापणी कापली, प्रायव्हेट पार्टवर सपासप वार, अफेअरच्या संशयातून छोटू पेटला

MP Crime News : परपुरुषांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकाने त्याच्या बायकोवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. आरोपीने बायकोचे डोळे फोडण्याचा प्रयत्न केला. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला.

Yash Shirke

Crime News In MP : मध्यप्रदेशच्या शिवपुरीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरुन एका व्यक्तीने त्याच्या बायकोवर जीवघेणा हल्ला केला. आरोपीने त्याच्या बायकोचे डोळे फोडण्याचा प्रयत्न केला. हल्ला करताना आरोपीने बायकोच्या शरीरावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर तो पळून गेला.

मध्यप्रदेशच्या शिवपुरीमधल्या भगवती कॉलनीमध्ये ही घटना काल (१२ फेब्रुवारी) घडली आहे. भगवती कॉलनीमध्ये राहणाऱ्या छोटू खानने त्याच्या बायकोवर हल्ला केला. तीन वर्षांपूर्वी छोटू खानने शहनाज खानशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्या दोघांमध्ये अनेक कारणांमुळे वादविवाद सुरु झाले होते. आपल्या बायकोचे परपुरुषांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय छोटू खानला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, काल आरोपी छोटू खानने त्याच्या बायकोकडे तिचा मोबाईल मागितला. शहनाजने मोबाईल देण्यास नकार दिला. यावर दोघांमध्ये वाद सुरु झाला. रागाच्या भरात छोटू खानने शहनाजवर चाकूने हल्ला केला. त्याने धारदार चाकूने शहनाजचे डोळे फोडण्याचा प्रयत्न केला. यात तिच्या डोळ्याच्या पापण्या कापल्या गेल्या. त्याने शहनाजच्या शरीरावर प्रामुख्याने प्रायव्हेट पार्ट्सवर सपासप वार केले. हल्ला करुन आरोपी छोटू खान फरार झाला.

हल्ल्यात जखमी झालेली शहनाज मोठ्याने ओरडू लागली. या आवाजाने शेजारचे लोक त्यांच्या घरासमोर जमले. शेजारच्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले आणि तिच्या माहेरच्या लोकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी शहनाज आणि आसपासच्या शेजाऱ्यांचा जबाब घेतला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : 'बिग बॉस' फेम अभिनेता विकतोय LPG सिलिंडर? किंमत वाचून येईल चक्कर

Maharashtra Live News Update : अमरावती ठरले देशातील सर्वाधिक उष्ण शहर; 41.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

Gas Cylinder Clash : गॅस सिलेंडरवरुन हाणामारी आणि राडा, एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत गेला वाद

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या निधीत कपात; ९५०० कोटी कापले; नेत्यानं थेट आकडेवारीच दिली

घरगुती गॅसचा साठा, व्यावसायिकांवर छापा; सामच्या ऑपरेशन सिलेंडरनंतर प्रशासनाला जाग

SCROLL FOR NEXT