Crime News Saam Tv
क्राईम

Mumbai Crime News: जन्मदात्या आईनेच केली पोटच्या ११ वर्षीय मुलीची हत्या; मुंबईतील बोरिवली परिसरातील घटना

Shocking Crime News: जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या करुन नंतर स्वत:हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Borivali Crime News

बोरिवली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या करुन नंतर स्वत:हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी बोरीवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबतचा अधिक तपास पोलिसांनकडून करण्यात येत आहे. (Borivali Crime News)('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पूर्वमधील कुलूप वाडी परिसरात दोघी वास्तव्यास होत्या. आरोपी महिला रेखा सोलंकी(वय४६) आणि पडित मुलगी (वय११) असे दोघींचे नाव आहेत. गुरूवारी रात्री(ता.१५)रोजी आरोपी रेखाने आपली मुलीची ओढणीने गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर मुलीला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले तर ,रेखा हिच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी महिला ही मानसिक आजाराने त्रस्त होती अशी माहिती आरोपी रेखा हिच्या पती राज सोलंरीने पोलिसांना दिली. काही दिवसांपासून मानसिक आजारावर उपचार रेखावर सुरु होते मात्र मानसिक आजाराव उपचार करण्यासाठी असलेली औषधे खाण्यासाठी रेखा ही घेत नसत,यामुळे ती राग करत असत. त्यातच तिचा गुरुवारी राग अनावर झाला.

यापूर्वी रेखाने आपल्या पतीवरही हल्ला केला होता. मात्र त्याने कोणतीही तक्रार देण्याचे टाळले होते.पती राजच्या तक्रारीवरुन रेखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच रेखा रुग्णालयातून परत आली की तिच्यावर पोलिस पुढील कारवाई करतीस.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT