Pune Crime Saam Tv
क्राईम

Pune Crime: पेट्रोल टाकून तिघांना जिवंत जाळलं, आई अन् २ चिमुकल्यांचा मृत्यू, तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं!

Pune Police: पुण्यामध्ये आई आणि दोन मुलांना जीवंत जाळण्यात आल्याची घटना घडली. हे हत्याकांड रांजणगाव परिसरात घडले. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रांजणगाव पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये आई आणि दोन मुलाला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरले आहे. पुण्यातल्या रांजळगाव खंडाळे येथे हे जळीतकांड घडलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणाचा रांजणगाव पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील पुणे -अहिल्यानगर हायवेनजीक रांजणगाव खंडाळे परिसरामध्ये ही घटना घडली. ग्रोवेल कंपनीच्या पाठीमागे एक महिला आणि दोन लहान मुलं यांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले. कंपनीच्या कामगारांनी सकाळी कामावर आले असता या तिघांचे मृतदेह पाहिले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. रांजणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

रांजणगाव खंडाळे हद्दीमध्ये या तिघांना आणण्यात आलं. त्यांच्यावरती पेट्रोल टाकून त्यांना जीवंत जाळण्यात आलं. मात्र पावसामुळे ते न पेटल्याने तिघांचेही मृतदेह तसेच राहिले. हत्या करण्यात आलेल्यांमध्ये आई, मुलगी आणि मुलाचा समावेश आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे या तिघांची ओळख पटली नाही. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास रांजणगाव पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT