Minor assault case India SAAM TV
क्राईम

Crime news: घरचे बाहेर गेले असताना घरात घुसला अन्..; शेजारी राहणाऱ्या तरूणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राज्यात खळबळ

Minor assault case India: राजस्थानच्या जैसलमेरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यावर गंभीर आरोप असून आरोपी फरार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

राजस्थानातील जैसलमेर शहरात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

घरी एकटी असताना घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अंदाजे १२ ते १३ वर्षांची असून तिचे आई-वडील कामासाठी बाहेर गेले होते. यावेळी संधी साधून शेजारी राहणाऱ्या एका तरूणाने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान हा गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.

दररोजचं काम आवरून संध्याकाळी आई-वडील घरी परतल्यावर मुलगी घरात दिसली नाही. यावेळी पालकांनी घाबरून आसपास शोध घेतला. बराच शोध घेतल्यानंतर ती मुलगी जवळच्या एका ठिकाणी घाबरलेल्या अवस्थेत सापडली. तिची अवस्था पाहून कुटुंबीयांना धक्का बसला आणि तिची चौकशी केली.

आईला सांगितली संपूर्ण घडलेली घटना

दरम्यान घडलेली संपूर्ण घटना मुलीने आईला सांगितली. शेजारी राहणाऱ्या युवकाने तिच्यावर जबरदस्ती केल्याचं तिने सांगितलं. हे ऐकताच कुटुंबीयांनी तिला तातडीने पोलीस ठाण्यात नेलं आणि आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली.

पोलिसांचा तपास सुरू

मुलीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर आता तक्रारीवरून आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान या घटनेवरून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दुर्देवी घटनेनंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manchurian Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी व्हेज मंच्यूरियन; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे यांचे परभणीत आगमन

Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल; पक्षातील नेते भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये उपस्थित

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी अन् हवामान बदलाच्या नुकसानीची भरपाई मिळणार; सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT