Crime News SaamTV
क्राईम

Mumbai Crime: मेघवाडी पोलिसांची मोठी कारवाई; कोडेनयुक्त कफ सिरपच्या ११९५ बाटल्या जप्त, आरोपी गोव्यातून गजाआड

Crime News: मेघवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत ११९५ कोडेनयुक्त कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या, ज्यांची बाजारातील किंमत ५.९७ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Dhanshri Shintre

संजय गडदे / साम टीव्ही न्यूज

मुंबईच्या मेघवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत, कोडेनयुक्त कफ सिरपचा तब्बल ११९५ बाटल्यांचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या कोडेयुक्त कब सिरपची बाजारभावातील किंमत पाच लाख ९७ हजार रुपये इतकी असल्याचे बोलले जाते. हा धक्कादायक प्रकार जोगेश्वरीच्या प्रेम नगर भागात उघडकीस आला आहे. छापेमारी दरम्यान मुख्य आरोपी शमशाद शेख गुंगारा देत पळून जाण्यात यशस्वी मात्र गुप्त माहिती दाराच्या मदतीने मेघवाडी पोलिसांनी आरोपी शमशाद शेख याला गोवा येथून अटक केली आहे.

जोगेश्वरी पूर्वेकडील प्रेम नगर परिसरात एक व्यक्ती कोडे नियुक्त कफ सिरप अवैधरित्या साठवणूक आणि विक्री करत असल्याची माहिती मेघवाडी पोलिसांना मिळाली. माहितीची खातर जमा करून मेघवाडी पोलिसांच्या पथकाने प्रेम नगर परिसरातील झोपडपट्टीत असलेल्या रूमवर छापा टाकला. मात्र पोलिसांना पाहताच संशयित शमशाद शेख पोलिसांना गुंगारा देत घराच्या खिडकीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान पोलिसांनी त्याच्या घराची झाडा झडती घेतली असता कोडेनयुक्त कफ सिरपच्या तब्बल ११९५ बाटल्या आढळून आल्या.या सर्व बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या.ज्यांची बाजारभावातील अंदाजे किंमत ५ लाख ९७ हजार रुपये आहे.

आरोपी फरार झाल्यानंतर परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पथक नेमण्यात आले. आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन, सरकारी तसेच खाजगी सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी गोव्यात असल्याचे पोलिसांना समजले. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस निरीक्षक कानडे, सहायक पोलीस निरीक्षक वाघ, पोलीस उपनिरीक्षक भोसले, गुसिंगे, पोलीस हवालदार दत्ता माने, घोडके, पोलीस शिपाई बागुल, बाविस्कर, सैदाने, औंध, माने, गावडे पोलीस हवालदार जाधव या तपास पथकाने आरोपीला गोव्यातून ताब्यात घेतले.

मुंबईसारख्या महानगरात, अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र, मेघवाडी पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा साठा रस्त्यावर येण्याआधीच जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रीच्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT