मेरठमधील 7 वर्षाच्या निरागस अंगदवीरची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला असून आरोपी अर्पित पराशरने पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी कबूल केल्या आहेत. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. प्राथमिक तपासात ही हत्या प्रेमसंबंधातून केल्याचे समोर आलं आहे. अंगदवीरच्या हत्येप्रकरणी आरोपी अर्पित पराशरने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, अंगदवीरला घडयाळ घेऊन देण्याचं आमिष दाखवून आपल्या कारमध्ये बसवलं. त्यानंतर त्याला 24 किमी दूर हस्तिनापुर येथे घेऊन गेला आणि भद्रकाली मंदिराजवळील जंगलात मुलाची हत्या केली असा घटनाक्रम सांगत त्याने गुन्हा कबूल केला आहे.
आरोपीने कबूल केलं की, मुलाचा आवाज दाबण्यासाठी त्याने पगडीने त्याचं तोंड बंद केलं, त्यानंतर चाकूने त्याच्या हाताची नस कापली आणि नंतर गळा आवळून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह शेतात फेकून दिला. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून मृतदेह ताब्यात घेतला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या हत्येचा छडा लावत आरोपी अर्पित पराशरला अटक केली आहे. तो बँकेमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होता, चौकशीत त्याने सांगितलं की, मुलाची आई गुरप्रीत कौरसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. अंगदवीर त्यांच्या नात्यात अडथळा ठरत होता, रविवारी अंगदवीरने त्याला आपल्या आईसोबत पाहिल्याने तो घाबरला होता. मुलगा ही गोष्ट कुटुंबीयांना सांगेल या भीतीने त्याने हा कट रचला आणि मुलाची हत्या केली.
अंगदवीरचे वडील गुरसेवक दुबईमध्ये नोकरी करतात. त्यांचे एक घर पंजाबमधील पटियाला येथे तर दुसरे बिजनौरच्या नजीमाबाद येथे आहे. आई गुरप्रीत कौर ही गावातील खासगी शाळेत शिक्षिका होती, मात्र दीड वर्षांपूर्वी तिने नोकरी सोडली. त्यानंतर ती नजीमाबाद येथील माहेरी राहत होती. याच दरम्यान तिचे अर्पितसोबत प्रेमसंबंध सुरू झाले होते. पतीच्या गैरहजेरीत अर्पित तिच्या घरी ये-जा करत असे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.