crime News saam Tv
क्राईम

Nandurbar Crime News : केळीच्या बागेत लावला गांजा; १७ लाख ७४ हजार रुपये किमतीचा २ क्विंटल ५३ किलो गांजा जप्त

Nandurbar Crime : शहादा तालुक्यातील नवानगर मधील एका केळीच्या बागेत गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आलाय.

Bharat Jadhav

Nandurbar Crime News :

नवानगर (ता.शहादा) येथे केळीच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन १७ लाख ७४ हजार रुपये किमतीचा २ क्विंटल ५३ किलो गांजा जप्त केला आहे. (Latest News)

उत्तर महाराष्ट्रात गांजा लागवडीचे प्रकार वाढू लागले आहेत. शिरपूर तालुक्यातील तूर आणि कापूस पिकात गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आलाय. आता शहादा तालुक्यातील नवानगर मधील एका केळीच्या बागेत गांजाची लागवड केल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी पोलिसांनी सुनील मेरसिंग चव्हाण ( वय-४७ ) ला अटक केलीय. पोलिसांनी चव्हाण यांच्या शेतातून पोलिसांनी १७ लाख ७४ हजार रुपये किमतीचा २ क्किंटल ५३ किलोचा गांजा जप्त केलाय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान ही कारवाई नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथक आणि शहादा पोलिसांनी केलीय. शेतात गांजाची लागवड केली जात असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर नंदुरबार पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाईचा बडगा उगारलाय. अवघ्या २४ तासांपूर्वी शिरपूर तालुक्यात तब्बल २ कोटींचा गांजा जप्त करण्यात आला होता.

शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गांजाची लागवड केली होती. त्यानंतर आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सुनील चव्हाण याने केळीच्या बागेत गांजाची लागवड केली होती. दरम्यान पोलिसांना केळीच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी पथक तयार केलं.

या पथकाने नवानगर शिवारातील वडगांव ते नवानगर रस्त्यावरील एका केळीच्या शेतात गेल्यावर त्यांना गांजाची रोपे आढळून आली. पोलिसांच्या पथकाने केळीचे संपूर्ण शेत पिंजून काढले असता त्यांना २ क्विंटल ५३ किलो ५८४ ग्रॅम वजनाचे १७ लाख ७४ हजार ६२६ रुपये किमतीची गांजाची झाडे मिळून आले.

शेतात पोलीस आल्याचे माहिती होताच शेताचा मालक सुनील मेरसिंग चव्हाण यांनी तेथून पळ काढला. याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर चव्हाण याचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलिस हवालदार संदीप गोसावी, पोलीस नाईक सुनील पाडवी, मोहन ढमढेरे, विशाल नागरे, बापू बागूल, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, अविनाश चव्हाण,पोलिस अंमलदार विजय ढिवरे, शोएब शेख, दीपक न्हावी, यशोदीप ओगले, हेमंत बारी, हेमंत सैंदाणे, उदेसिंग तडवी यांनी ही कारवाई केली.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हनुमान येथील शेतातही गांजाची लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत ३ कोटी १० हजार रुपयांचा ओला गांजा जप्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT