manvat police charged two for hitting government officer saam tv
क्राईम

Parbhani Crime News : मानवत तहसील कार्यालयात मंडल अधिका-यास बेदम मारहाण, दाेघांवर गुन्हा दाखल; महसूल कर्मचा-यांमध्ये असंताेष

Parbhani Latest Marathi News : वाळू माफियांकडून मंडल अधिकारी यांस मारहाण झाल्याने परभणी जिल्ह्यातील महसूल कर्मचा-यांमध्ये तीव्र असंताेष पसरला आहे.

राजेश काटकर

Parbhani :

अवैध वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करणारा ट्रक पकडल्याने वाळू माफियांनी परभणी येथील मानवत तहसील कार्यालय परिसरात अधिका-याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी मानवत पाेलिस ठाण्यात अधिका-याने दाेघांबाबत तक्रार दिली आहे. पाेलिसांनी त्यानूसार शासकीय कामात अडथळा या कलमासह विविध कलमान्वये गुन्हा दाख केला आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार परभणी येथील मानवत तहसील कार्यालयात अवैध मार्गाने काढलेली वाळूचा ट्रक एका अधिका-याने पकडून आणला हाेता. हा ट्रक पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे का असा सवाल करत दाेघा जणांनी मंडल अधिकारी जगन बिडवे यांना मारहाण केली. त्याबाबत त्यांनी तक्रार दिली आहे.

मंडल अधिकारी जगन बिडवे यांच्या तक्रारीनूसार विठोबा घाडगे, लक्ष्मीकांत तिडके या दोघांवर शासकीय कामात अडथळा आणणे, गंभीर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणे या कलमानूसार गुन्हा दाखल केल्याचे मानवत पोलिसांनी सांगितले. दरम्यान मंडल अधिकारी यांस मारहाण झाल्याने परभणी जिल्ह्यातील महसूल कर्मचा-यांमध्ये तीव्र असंताेष पसरला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

SCROLL FOR NEXT