Pune Crime News  Saam Digital
क्राईम

Pune Crime News : जागरुक नागरिकांमुळे पाच सशस्त्र दरोडेखोर अटकेत; 5 तोळे सोने, 18 किलो चांदीसह 2 लाख 22 हजार हस्तगत

मंचर पोलीस ठाण्यात संशयितांवर गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रोहिदास गाडगे

Pune Crime News : ऐन सणासुदीच्या तोंडावर मंचर शहरात मध्यरात्रीच सात जणांच्या टोळीने एका ज्वेलर्सवर सिनेस्टाइलने दरोडा टाकला. दरम्यान नागरिक आणि मंचर पोलीसांच्या सतर्कतेमुळे दराेडेखाेरांना पकडण्यात आले. पाेलीसांनी पाच जणांना मुद्देमालासह अटक केली आहे. (Maharashtra News)

मंचर शहरातील उत्तमभाग्य ज्वेलर्स (uttam bhagya jewellers) या सोन्याच्या दुकानात मध्यरात्री 7 तरुणांकडुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन तरुण (youth) पळुन जाण्याच्या तयारीत हाेते.

दरम्यान मंचर शहरातील जागरुक नागरिकांच्या सतर्कतेमुळे 7 जणांची टोळी दुकानवजा घरात असतानाच मंचर पोलीसांनी पाच जणांना सिनेस्टाइलने घटनास्थळीच अटक केली. या घटनेत दोन जण पळुन जाण्यात यशस्वी झाले.

पाेलीसांनी अटकेतील पाच दरोडेखोरांकडून 18 किलो 710 ग्राम चांदी, दाेन लाख 22 हजार रोकड व पाच तोळे सोने असा मुद्देमाल ताब्यात घेतला. या दराेडेखाेरांकडून कोयते, गॅस कटर व इतर हत्यारे हस्तगत केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंचर पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार वैभव बाळू रोकडे (वय 24 रा. नागाचा खडक मुरबाड), गणेश रामचंद्र टोके(वय 26 रा. नडे ता. मुरबाड), अजय सखाराम भिसे ( वय20 रा. कलगाव ता. शहापूर) ग्यानसिंग भोला वर्मा (वय 23 रा. घोडबंदर रोड ठाणे) व मोहम्मद अरमान दर्जी (वय 23 रा. नेहरूनगर कुर्ला) यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT