Mumbai Cime News Saam Digital
क्राईम

Crime News: संतापजनक! प्रेमास नकार दिल्याने तरुणीवर धारधार शस्त्राने वार

Mumbai Cime News: प्रेमास नकार दिल्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर ३५ वर्षीय व्यक्तीने भररस्त्यात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Goregaon Crime News

राजधानी मुंबईमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमास नकार दिल्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर ३५ वर्षीय व्यक्तीने भररस्त्यात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला आहे. सध्या तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी आरोपीरोद्धात गुन्हा दाखल केला आहे.हल्ला केल्यानंतर तो पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्व येथे सोमवारी(ता.१५) रोजी ही धक्कादायक घटना घडली. गोरेगाव येथे राहणारा आरोपी संजय बयास याने त्याच्या परिसरात राहणाऱ्या तरुणीस तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत होता. पंरतू पीडित तरुणीने(वय.१९)त्याच्या प्रेमाला नकार दिला होता. तरुणी बी.कॉम.च्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. तरुणीने बयासला नाही बोल्यानंतर तरुणीचे कुंटुब आणि बयास यांच्यामध्ये काही वाद झाले होते परंतू नंतर गोष्टी निवळल्या होत्या.

मनात शिजत होता कट

सगळ्या गोष्टी निवळल्या असलेल्या होत्या असे सगळ्यांना वाटत असल्यातरी बयासच्या मनाला तरुणीचा नकार पचवता आला नाही. सोमवारी दुपारी पीडित तरुणी घरी परतत असताना बयास पाठीमागून त्याने तिचे डोके धरले आणि ब्लेडच्या साहाय्याने तिचा गळा चिरला. सर्व घटना तरुणीच्या घराजवळच घडली. वार केल्यानंतर आरोपी घटना स्थळावरुन लगेचच फरार झाला आणि तरुणीला परिसरातील लोकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सर्व घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

प्रकृती स्थिर

तरुणीला झालेली जखम खोल असून चार टाके पडले आहेत. मात्र सध्या तरुणीची प्रकृती स्थिक असून तिच्याकडून सर्व घटनेची माहिती घेतली असून बयास विरोध्दात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, तरुणीवर हल्ला केला तेव्हा बयास दारुच्या नशेत असल्याचा आम्हाला संशय आहे. त्याच्याविरोध्दात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांची सध्या ओळख पटवण्याचे काम चालू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

Water After Tea : चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिता? सावधान! होतात 'या' ३ गंभीर समस्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवरील कारवाईच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

SCROLL FOR NEXT