Youth killed talathi : Saam tv
क्राईम

Hingoli Crime : हिंगोलीत खळबळ, तलाठी कार्यालयातच तलाठ्याचा खून , सनकी तरुणाने निर्घृणपणे घेतला जीव!

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीतून खळबळजनक घटना समोर आली आहे. हिंगोलीत एका तरुणाने तलाठ्याला चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगावामध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या वसमत तालुक्यात महसूल प्रशासनातील तलाठ्याला चाकूने भोसकून ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जीवघेण्यात हल्ल्यात तलाठी संतोष पवार जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. शासकीय काम करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत तरुणाने संतापाच्या भरात तलाठ्याला संपवल्याचा भयंकर प्रकार घडला आहे.

तरुणाने तलाठी कर्तव्य बजावत असलेल्या आडगावमधील कार्यालयात दुचाकीवर येत हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. तलाठ्याची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. या घटनेतील आरोपीचे नेमकं नाव काय आहे, हे कळू शकलेले नाही. तलाठ्याकडून कोणत्या कामाची अडवणूक झाली हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या घटनेने संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचं तलाठ्याकडे काम प्रलंबित होतं. तलाठ्याने काम पूर्ण करावे, यासाठी तरुणाने अनेकदा फेऱ्या मारल्या. तरीही शासकीय काम पूर्ण करण्यास तलाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप तरुणाचा असल्याचा माहिती मिळत आहे. शासकीय काम करण्यास टाळाटाळ करत असल्याने सनकी तरुणाने संतापाच्या भरात तलाठ्याची हत्या केल्याची माहिती मिळत आहे. हत्या करणारा तरुण कोण आणि त्याच्या कोणत्या कामाची अडवणूक झाली होती, हे अद्याप समोर आलेले नाही. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT