Crime News Video X
क्राईम

Crime News : सुट्टी नाकारली, कर्मचारी संतापला; ४ सहकाऱ्यांवर केले सपासप वार

Crime News Update : ऑफिसमध्ये सुट्टी न दिल्याने कर्मचाऱ्याने चार सहकाऱ्यांवर हल्ला केला. चारही सहकाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Yash Shirke

Crime News : अनेक ठिकाणी ऑफिसमध्ये सुट्ट्यांवरुन मारामार होत असते. काहीजण बॉसला मस्का मारुन रजा मंजूर करुन घेतात. तर काही लोक आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने काम मॅनेज करतात. कधीकधी सुट्टीवरुन ऑफिसमध्ये भांडणं देखील होतात. अशाच एका घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. सुट्टी नाकारल्याने एका व्यक्तीने ऑफिसमधल्या चार सहकाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

कोलकाताच्या एका तांत्रिक शिक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांवर हल्ला केला. त्यानंतर तो रक्ताने माखलेला चाकू घेऊन रस्तावरुन फिरु लागला. दरम्यान रस्त्यावरुन जाणाऱ्यांनी त्या व्यक्तीचा व्हिडीओ काढला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव अमित सरकार असे आहे. तो कोलकाताच्या न्यूटाउन भागातल्या एका तांत्रिक शिक्षण भागामध्ये कामाला आहे. त्याने ऑफिसमध्ये सुट्टीसाठी अर्ज केला होता. दरम्यान रजा फेटाळल्याच्या रागात त्याने सहकाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. यात ऑफिसमधले चार जण जखमी झाले.

जखमींना ऑफिसच्या जवळ असणाऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. चौघांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हल्ला करणाऱ्या व्यक्तीला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. हल्लेखोराला मानसिक आजार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT