Varap Village Titwala | टिटवाळ्याजवळील वरप गावानजीक निर्जनस्थळी बेवारस सापडलेल्या बॅगमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. SAAM TV
क्राईम

Kalyan Crime : निर्जनस्थळी पडलेल्या बॅगेत नग्नावस्थेत सापडला मृतदेह, टिटवाळा हादरले

Varap, Titwala village Crime News : टिटवाळानजीकच्या वरप गावाजवळ निर्मनुष्य ठिकाणी बॅग आढळली. ही बॅग उघडताच गावकऱ्यांना धक्काच बसला.

Saam Tv

कल्याण तालुक्यातील टिटवाळानजीक असलेल्या वरप गावाजवळ निर्जनस्थळी पडलेल्या बेवारस बॅगेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या बॅगमध्ये अंदाजे ६५ ते ७० वयोगटातील व्यक्तीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

टिटावाळाजवळच्या वरप गावानजीक निर्मनुष्य ठिकाणी एक बॅग आढळून आली. या बॅगमध्ये कुजलेल्या आणि नग्नावस्थेत मृतदेह होता. वृद्धाची हत्या झाल्याचा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावकरी हादरले

कल्याण तालुक्यातील वरप गावातील काही जण घटनास्थळाच्या परिसरातून जात होते. त्यांना निर्जनस्थळी एक बेवारस बॅग दिसून आली. गावकऱ्यांनी तात्काळ ही बाब कल्याण तालुका पोलिसांना कळवली. काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी तोपर्यंत फॉरेन्सिक पथकालाही पाचारण केलं होतं. त्यांच्यासमोरच पोलिसांनी ही बॅग उघडली. बॅगमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. साधारण ६५ ते ७० वयोगटातील पुरुषाचा मृतदेह नगावस्थेत होता. ही हत्या असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

निळ्या रंगाची बॅग बघूनच घाम फुटला

वरप गावाजवळच्या निर्मनुष्य भागात एक निळ्या रंगाची बॅग पडली होती. त्या बॅगकडे तेथूनच जाणाऱ्या एका ग्रामस्थाचे लक्ष गेले. ती बॅग बघूनच त्याला घाम फुटला. याबाबतची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक पथकालाही बोलावले. त्यांच्यासमोरच पोलिसांनी बॅग उघडून बघितली. या बॅगेत मृतदेह आढळला. मृतदेह कुजलेला असल्यामुळं ओळख पटवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे. तसेच मारेकऱ्याचा शोधही सुरू केला आहे.

दादर रेल्वे स्थानकातही बॅगमध्ये आढळला होता मृतदेह

टिटवाळाजवळच्या वरप गावानजीक निर्जनस्थळावर बॅगमध्ये मृतदेह आढळल्याने कल्याण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याआधीही दादर रेल्वे स्थानकावर एका बॅगमध्ये मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली होती. काही जण बॅग घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले होते. संशय आल्याने पोलिसांनी ही बॅग उघडून बघितली होती. त्यात नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आला होता. तो मृतदेह सांताक्रूझमध्ये राहणाऱ्या अर्शद शेखचा असल्याची माहिती उघडकीस आली होती. या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा सहावा अध्याय कोणती शिकवण देतो?

SCROLL FOR NEXT