Ahilyanagar Crime 
क्राईम

Ahilyanagar Crime: चेष्टा केल्यानं मित्रावर कात्रीने हल्ला, युवकाचा मृत्यू, घटनेचा CCTV व्हिडिओ व्हायरल

Ahilyanagar Crime: चेष्टा करणं एकाच्या जीवावर बेतलंय. दोन मित्रांच्या भांडणात एकाचा खून झालाय. मारामारीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. या हत्येप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

Bharat Jadhav

सुशील थोरात, साम प्रतिनिधी

चेष्टा केल्याने एकाने आपल्याच मित्रावर कात्रीने हल्ला करत त्याचा खून केल्याची घटना अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात घडलीय. मित्रावर कात्रीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. शुक्रवारच्या दिवशी दोन मित्र मेडिकलमध्ये चेष्टा करत उभे होते. परंतु विनोद केल्याचा राग अनावर झाला आणि एका मित्राने चेष्टा करणाऱ्यावर कात्रीने हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे मित्र गंभीर जखमी झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, शमसुद्दीन खान असे हल्ला करणाऱ्या मुलाचे नाव आहे तर हल्ल्यात मृत पावलेल्या मुलाचे नाव जिशान खान आहे. शमसुद्दीन खान आणि जिशान खान हे दोघेही शहरातील मुकुंदनगर परिसरातील मेडिकलमध्ये चेष्टा करत उभे होते. याच चेष्टेचा राग शमसुद्दीन खानला आला त्याने आपला मित्र जीशान खानवर कात्रीने हल्ला चढवला होता. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर जखमी जिशान खान याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान जिशान खानचा मृत्यू झाला.

शुक्रवारी रात्री एका मेडिकल दुकानात मस्करी करीत असतांना झालेल्या या भांडणाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हल्ला करणारा शमसुद्दीन खान हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

SCROLL FOR NEXT