MP Crime News Saamtv
क्राईम

MP Crime News: पती, पत्नी अन् मुलगा, एकाच कुटुंबातील तिघांनी संपवले आयुष्य; भयंकर घटनेचे धक्कादायक कारण समोर

MP Crime News: पती पत्नीसह एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातून समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

Madhya Pradesh Crime:

पती पत्नीसह एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातून समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीवरुन या आत्महत्येचे धक्कादायक कारणही समोर आले आहे. (Crime News In Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुरावली भागात राहणारे जितेंद्र झा हे मजुरीचे काम करतात. जितेंद्र यांची पत्नी त्रिवेणी आणि मुलगा अचल झा त्यांच्यासोबत राहते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे बंद होते. रविवारी (२८, जानेवारी) शेजारी राहणाऱ्या लोकांना दुर्गंधी येत होती. यानंतर लोकांना संशय आल्याने याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच सिरोल पोलीस ठाण्याचे प्रभारी विनयसिंह तोमर फौजफाट्यासह दाखल झाले. आत गेल्यावर घरातले दृश्य पाहून पोलीसही हादरुन गेले. घरामध्ये पती, पत्नी आणि मुलाचा मृतदेह दोरीला लटकत असल्याचे दिसले. तसेच जितेंद्र झा यांच्या हातावर ब्लेड, चाकूच्या खुणाही आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या घटेनंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा खून आणि आत्महत्येच्या दृष्टीने तपास करत आहेत. घटनास्थळी मुलगा अचल झा याच्याकडे एक चिठ्ठी सापडली. ज्यामध्ये एका व्यक्तीच्या नाराजीमुळे मुलाने आत्महत्या केली आता मीही आत्महत्या करणार आहे, असे म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT