ASI Crushed Yandex
क्राईम

Madhya Pradesh Crime: वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याला ट्रॅक्टरने चिरडलं, परिसरात दहशतीचं वातावरण

ASI Crushed By Sand Mafia: वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याची ट्रॅक्टरने चिरडून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील शहडोल जिल्ह्यात घडली आहे.

Rohini Gudaghe

मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याची ट्रॅक्टरने चिरडून हत्या (Madhya Pradesh Crime) केल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील शहडोल जिल्ह्यात घडली आहे.

मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात वाळू माफियांनी एका एएसआयची ट्रॅक्टरने चिरडून हत्या केल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेओहरी परिसरातील बडौली गावात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली (ASI Crushed By Sand Mafia) होती. यानंतर एएसआय महेंद्र बागरी आणि अन्य दोन पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा एएसआय महेंद्रने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ट्रॅक्टर चालकाने पोलीस अधिकारी महेंद्र बागरीला चिरडून त्यांची हत्या केली आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, शहडोल जिल्ह्यापासुन सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्योहारी पोलीस स्टेशन आहे. त्या परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. (crime mews) मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये वाळू माफियांनी मोठी गुंडगिरी पाहायला मिळत आहे. येथे वाळू माफियांनी एका एएसआयला ट्रॅक्टरने चिरडलं. यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. भरधाव वेगात असलेल्यामुळे वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन पुलाला धडकून उलटले. त्यानंतर वाहन चालक राज रावत आणि आशुतोष सिंग यांना अटक करण्यात आलीय. वाहन मालक सुरेंद्र सिंह फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि खनिकर्म कायद्याच्या तरतुदीनुसार खून आणि अवैध वाळू उत्खननाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Sand Mafia In Shahdol) शहडोल झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डीसी सागर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र सिंगला पकडण्यात पोलिसांना मदत करणाऱ्या व्यक्तीला तीस हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

SCROLL FOR NEXT