Lucknow Crime Saam Tv
क्राईम

Lucknow Crime News: भर मार्केटमध्ये नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Crime News : लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या बायकोवर दिवसाढवळ्या भर मार्केटमध्ये कात्रीने वार केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Lucknow Crime News:

लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या बायकोवर दिवसाढवळ्या भर मार्केटमध्ये कात्रीने वार केले आहे. आरोपीने आपल्या बायकोवर एक-दोन वेळा नव्हे तर १९ वेळा वार केले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ब्रिजमोहन निषाद असे आरोपीचे नाव आहे. तो डाळीगंजमधील रहिवासी आहे. त्याने बायकोवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शहरातील कुतुबपूर परिसरातील लांबकेश्वर पार्कजवळील भाजी मार्केटमध्ये घडली आहे. (Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजमोहन निषादवर अनेक कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेचा मुलगा राहुलने पोलिसांना यासंबंधित माहिती दिली. त्याची आई ७ जानेवारीला सकाळी भाजी मार्केटमध्ये गेली होती. अचानक ब्रिजमोहन तिच्याजवळ आला आणि काही सेकंदातच तिच्यावर कात्रीने वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो घटनास्थळावरुन पळून गेला. असे पोलिसांनी सांगितले.

५२ वर्षीय पीडित महिलेवर सध्या केजीएमयूमध्ये उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती आता बरी असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजमोहनला त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत. त्यामुळेच ब्रिजभूषणने टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी मुलाने पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे. त्याच्या वडिलांनी यापूर्वी अनेकदा आईवर हल्ला केला होता. यासंबंधित डिसेंबरमध्ये पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT