Lonavala Crime  SaamTv news
क्राईम

Crime: माहेरी निघालेल्या महिलेचा दुचाकीवरून पाठलाग; निर्जनस्थळी नेत बलात्कार, लोणावळा हादरले

Lonavala Crime: लोणावळ्यामध्ये ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. माहेरी निघालेल्या या महिलेसोबत भयंकर घडलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Priya More

सागर आव्हाड/ दिलीप कांबळे, साम टीव्ही

लोणावळ्यामध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ठाकूरसाई गावात ही घटना घडली. हे गाव मावळच्या पवनानगर भागात येते. याठिकाणी राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेला जबरदस्ती निर्जनस्थळी ओढत नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे लोणावळ्यात खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळू शिर्के असं आरोपीचे नाव आहे. पीडित महिला माहेरी जाण्यासाठी निघाली होती. तेव्हा आरोपी बाळू शिर्केने दुचाकीवरून तिचा पाठलाग सुरू केला. रस्त्यावर कुणीही नसल्याचे पाहून त्याने महिलेला बळजबरीने ओढत एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी पीडितेला त्याच अवस्थेत सोडून पळून गेला. त्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली आठ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आला. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ७ दिवसांची पोलिस कोडणी सुनावण्यात आली. लोणावळा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी कोणताही ठोस पुरावा नसताना मोठ्या शिताफीने तपासाला सुरुवात केली.

घटनास्थळापासून बऱ्याच लांब असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पीडितेचा पाठलाग करताना पोलिसांना दिसून आले. विशेष म्हणजे आरोपीने घातलेल्या जॅकेटमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिांनी आरोपीचा शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये शोधमोहीम राबवली आणि अखेर आरोपी बाळू शिर्कला अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले. त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT