Latur Crime News Saam TV
क्राईम

Latur Crime: 'नमस्कार' घालण्यावरुन वाद... सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला; एकाचा जागीच मृत्यू; भयंकर घटनेने लातुर हादरलं

Crime News: केवळ नमस्कार घालण्यावरुन झालेल्या या भयंकर हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. हल्ल्यानंतर मारेकरी फरार झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Gangappa Pujari

संदिप भोसले, लातुर|ता. ६ जानेवारी २०२४

Latur Crime News:

पुणे शहरात कुख्यात गुंड शरद मोहोळची भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता लातूरमधून एक धक्कादायक घटना घडलीय. लातूरच्या औसा तालुक्यात नमस्कार केल्यावरुन दोन गटात राडा झाला. यामध्ये एका तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या भयंकर घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, किरकोळ वादातून लातुरच्या (Latur) एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. औसा तालुक्यातील होळी गावात ही धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी रात्री (५ जानेवारी) गावामध्ये विनाकारण नमस्कार घातल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला.

या वादाचे पुनर्वसन मोठ्या भांडणात झाले अन् दोघा सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये एकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. केवळ नमस्कार घालण्यावरुन झालेल्या या भयंकर हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. हल्ल्यानंतर मारेकरी फरार झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नांदेडमध्ये तरुणाची हत्या..

नांंदेड शहरात (Nanded) 26 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात आरोपीने तरुणानाचा खून करून डोकं शरीरापासून वेगळं केल. हिंगोली गेट मैदानावर काहींना हा मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. विकास राऊत असं या तरुणाच नाव असून तो यवतमाळ जिल्हातील उमरखेड येथील रहिवासी आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT