Husband shoots wife over movie dispute Saam tv
क्राईम

Crime News : चित्रपट अर्ध्यात सोडून निघाली बायको, नवऱ्याला आला राग, रिव्हॉल्व्हरने झाडल्या गोळ्या

Kolkata Crime News : आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट अर्ध्यामध्ये सोडून घरी गेल्याने कोलकातामधील जोडप्यात वाद सुरु झाला. रागात नवऱ्याने बायकोवर रिव्हॉल्व्हरने तीन गोळ्या झाडल्या.

Yash Shirke

Kolkata Crime Incident : कोलकातामधून एक भयानक घटना समोर आली आहे. कोलकाताच्या नैहातीमध्ये चित्रपट पाहण्यावरुन झालेल्या वादात नवऱ्याने त्याच्या बायकोवर गोळ्या झाडल्या. चित्रपट अर्धात सोडल्याचा राग नवऱ्याला आला आणि त्याने त्याच रागात बायकोवर लायसन्स रिव्हॉल्व्हरमधून तीन गोळ्या मारल्या. गोळ्या झाडणाऱ्याचे नाव महेंद्र प्रताप घोष आणि त्याच्या बायकोचे नाव चंद्रलेखा घोष असे आहे.

महेंद्र प्रतापने झाडलेल्या गोळ्या छाती, हात आणि पायात लागल्याने चंद्रलेखाच्या बराकपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर शस्त्रक्रिया झाली असून तीन गोळ्या शरीरातून काढण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी महेंद्र प्रताप घोषवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची बंदुक पोलिसांनी जप्त केली आहे. महेंद्र प्रतापला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महेंद्र प्रताप आणि चंद्रलेखा यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून त्या दोघांमध्ये सतत वाद सुरु होते. ते शुल्लक भांडणावरुन एकमेकांशी भांडत असतं.

रविवारी (१२ जानेवारी) महेंद्र प्रताप आणि चंद्रलेखा यांचा वाद शिगेला गेला. महेंद्र प्रतापने नुकताच प्रदर्शित झालेला त्याच्या आवडत्या अभिनेत्याचा बंगाली चित्रपट पाहण्याचा चंद्रलेखाकडे आग्रह धरला. यावर ती नाही म्हणाली. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. पुढे हो-नाही असं करत ते दोघे चित्रपट संध्याकाळी ४-७ चा शो पाहण्यासाठी गेले. चित्रपटादरम्यान त्यांचे भांडण सुरुच होते. चंद्रलेखा मध्यंतरामध्ये ६ च्या सुमारास सिनेमागृहातून निघून घरी गेली. संपूर्ण चित्रपट पाहून महेंद्र प्रताप ७.१५ च्या सुमारास घरी परतला. घरी परतल्यावर नंतर पुन्हा दोघांमध्ये वाद सुरु झाला. ८ च्या सुमारास त्याने चंद्रलेखावर गोळ्या झाडल्या, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.

दरम्यान महेंद्र प्रतापने रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळ्या चुकून झाडल्या गेल्या असे पोलिसांना सांगितले आहे. या गोष्टीला चंद्रलेखाचे काका बबलू घोष यांनी दुजारा दिला आहे. त्या दोघांमध्ये भांडण झाले नसून बंदुकीतून चुकून गोळ्या निघाल्याचा दावा बबलू घोष यांनी केला आहे. पहिली गोळी निघाल्यानंतर रिव्हॉल्व्हर खाली पडली आणि दोन गोळ्या निघाल्या असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चंद्रलेखाचा जबाब घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT