Kolhapur Hupari Crime News: Saamtv
क्राईम

Kolhapur Crime: चांदी व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, तब्बल २५ किलो चांदी लंपास; कोल्हापूर हादरलं

Kolhapur Hupari Crime News: हत्या करून सुमारे 25 किलो चांदीची चोरी झाल्याचे उघड झाले असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. २३ सप्टेंबर

Silver Trader Death In Robbery: कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावात एका बड्या चांदी व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ब्रम्हनाथ सुकुमार हालोंढे असे हत्या झालेल्या चांदी व्यावसायिकाचे नाव आहे. हत्या करून सुमारे 25 किलो चांदीची चोरी झाल्याचे उघड झाले असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात खून, मारामाऱ्यांसारख्या गंभीर घटनांची मालिकाच सुरु आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबई पुणे, नाशिकमध्ये हत्येच्या घटना समोर आल्या होत्या. अशातच आता कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील हुपरीमध्ये चांदी व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ब्रम्हनाथ सुकुमार हालोंढे (वय 29 वर्ष) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हत्या करुन घरातील 25 किलो चांदीची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे चोरीच्या उद्देशानेच ही भयंकर घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे, तसेच याप्रकरणी एका संशयितासही अटक करण्यात आली असून गोकुळ शिरगांव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT