rescue woman who chained for two months  Saam Tv News
क्राईम

Kolhapur News : गळ्यात, पायात साखळदंड अन् कुलूप, दोन महिन्यांपासून महिलेला डांबलं; कोल्हापुरात भयंकर घटना उघड

Kolhapur Crime : कोल्हापूरातील राजापुरी येथील सायबर चौक परिसरात असलेल्या दौलतनगर भागातील एक दोन मजली घर आहे. या घरामध्ये गेल्या महिनाभरापासून ४० वर्षीय सारिका साळी या महिलेला तिच्या कुटुंबातील सदस्यांनी साखळदंडाने बांधून ठेवलं होतं.

Prashant Patil

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एका महिलेला साखळदंडाने बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी इथे ही घडना घडली. एका ४० वर्षीय महिलेला साखळदंडाने बांधून ठेवण्यात आलं. महत्वाचे म्हणजे या महिलेच्या गळ्यात आणि पायाला साखळीने बांधून त्याला कुलूप लावण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या महिलेची सुटका केली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कोल्हापूरातील राजापुरी येथील सायबर चौक परिसरात असलेल्या दौलतनगर भागातील एक दोन मजली घर आहे. या घरामध्ये गेल्या महिनाभरापासून ४० वर्षीय सारिका साळी या महिलेला तिच्या कुटुंबातील सदस्यांनी साखळदंडाने बांधून ठेवलं होतं. ही माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना कळवली होती. पोलिसांनी आज अचानक त्या घरावर धाड टाकून महिलेची मुक्तता केली. ही महिला खूपच अशक्त झाली आहे. पीडित महिलेच्या गळ्याला आणि पायाला जाड साखळीने बांधून ठेवत त्याला मोठं कुलूप लावण्यात आलं होतं. पोलिसांनी या महिलेची सुटका करत तिच्या गळ्यातील आणि पायातील साखळी काढून तिला रुग्णालयात नेलं. पीडित महिलेचं म्हणणे आहे की, 'भावाने आणि घरच्यांनी मला बांधून ठेवलं होतं. त्यांनी मला चांगल्यासाठी बांधून ठेवलं होतं.'

या महिलेच्या शेजारी राहणाऱ्यांनी सांगितले की, 'महिलेच्या घरातील सर्वजण कामासाठी बाहेर जातात. ही महिला वेडसर आणि अपंग असल्यामुळे घरातील लोकांनी तिला बांधून ठेवलं. बाहेर गेल्यावर ती दगड मारणे, बडबडणे असं कृत्य करते म्हणून घरातल्यांनी वैतागून तिला बांधून ठेवलं.' पोलिसांनी महिलेला रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात नेलं. ती खूपच अशक्त झाली आहे. ही बातमी जेव्हा साम टीव्हीने दाखवली तेव्हा याची दखल घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयंत म्हणून ज्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं त्याला संजय पवार यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न करत जाब विचारला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत संशयित तरुणाची सुटका करून त्याला पोलिस ठाण्याच्या दिशेने घेऊन गेले.

या महिलेवर सध्या कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू असून नातेवाईकांनी साखळदंडाने बांधून ठेवलं होतं , त्यांची चौकशी राजारामपुरी पोलीस ठाण्याकडून सध्या सुरू करण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT