Kolhapur Crime News Saam Tv
क्राईम

Shocking: जन्मदात्या बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चाकूचा धाक दाखवत भयंकर कृत्य; कोल्हापूर हादरले

Kolhapur Crime News: कोल्हापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बापाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील एका गावामध्ये ही घटना घडली. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात नराधाम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील एका गावामध्ये ही भयंकर घटना घडली. बापाने १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. गणेशोत्सवादरम्यान ही घटना घडली होती. पण दोन दिवसांपूर्वी बापाने पु्न्हा मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीच्या आईने ते पाहिलं त्यानंतर तिने बापाच्या तावडीतून मुलीची सुटका केली आणि थेट पोलिस ठाणे गाठले.

आरोपीने चाकूचा धाक दाखवत हे भयंकर कृत्य केले. पीडित मुलीच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. आरोपी बापाला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महिला संघटनांसह सामाजिक संस्थांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई आणि दोन लहान मुलं कोल्हापूरात राहत होती. पीडित मुलीची आई भंगार गोळा करून घर सांभाळते. दिवाळी तोंडावर असल्याचे कारण देत आरोपी मुलीला गावी घेऊ गेला. तेव्हा त्याने तिला चाकूचा धाक दाखवून मुलीवर बलात्कार केला. तसंच कुणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकेल अशी देखील धमकी देण्यात आली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने कुणालाच हे सांगितले नाही. शेवटी तिच्या आईने बापाला तिच्यावर अत्याचार करताना पाहिले तेव्हा ही घटना समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gavaricha Thecha Recipe: घरच्या घरी बनवा गावरान चवीचा झणझणीत गवारीचा ठेचा, वाचा सोपी रेसिपी

World Largest Parad Shivling: जगातील सर्वात मोठ्या ५२११ किलो पारद शिवलिंगाची हरिद्वारमध्ये प्राणप्रतिष्ठा...

नसांमध्ये घाण कोलेस्ट्रॉल वाढवतात 'हे' 4 पदार्थ; निरोगी हृदयासाठी कधीच खाऊ नका

Gold-Silver Rate : २४ तासांत मार्केट जाम! सोनं ४,५०० रुपये, चांदी १३००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीत आजचा भाव काय?

Maharashtra News Live Update: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक; मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित

SCROLL FOR NEXT