Karnataka News Saam Tv
क्राईम

Teacher Assault : शिक्षकाची क्रूर शिक्षा! आजीला फोन केल्यामुळे विद्यार्थ्याला मारहाण, VIDEO व्हायरल

Karnataka News : कर्नाटकात शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून, या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

Alisha Khedekar

कर्नाटकातील शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारलं

व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली

विद्यार्थ्याने आजीला फोन केल्यामुळे शिक्षक संतापले होते

पालकवर्गात संतापाची लाट

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात नायकनहट्टी परिसरातील श्रीगुरु थिप्पेरुद्रास्वामी निवासी वेद विद्यालयातील आहे. ही घटना सुमारे आठ महिने जुनी असल्याचे सांगितले जात आहे, परंतु त्याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. व्हिडिओमध्ये शिक्षक वीरश हिरेमठ एका विद्यार्थ्याला वारंवार मारहाण करताना दिसत आहेत.

विद्यार्थ्याच्या पालकांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या मोबाईल फोनवरून त्याच्या आजीला फोन केला होता. ज्यामुळे शिक्षक संतापले आणि त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. विद्यार्थ्याने वारंवार माफी मागितली परंतु शिक्षकाने दया दाखवली नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी तपास सुरू केला आणि कलबुर्गी येथील आरोपी शिक्षक वीरश नन्ना हिरेमठ याला अटक केली.

चित्रदुर्गाचे पोलिस अधीक्षक रणजित कुमार यांनी सांगितले की, आरोपीला न्यायालयात हजर केले जाईल आणि पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर, पीडित विद्यार्थ्याने शाळा सोडली आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळवल्यानंतर दुसऱ्या संस्थेत प्रवेश घेतला. अशा घटनांनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतवर प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Ticket Discount News: प्रवाशांसाठी गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर मिळणार ३ टक्के सूट; वाचा काय आहे 'ही'योजना?

Maharashtra Live News Update: आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे कारागृहातून लढवणार निवडणूक

Bollywood Movies 2026: 'बॅटल ऑफ गलवान' ते 'धुरंधर २'; २०२६मध्ये प्रदर्शित होणार बॉलिवूडचे हे मोठे चित्रपट

Kasba Ganpati : भाविकांसाठी आनंदवार्ता! पुण्यातील प्रसिद्ध मंदिर दर्शनासाठी खुले; वाचा सविस्तर

BMC Election 2026: अखेरच्या क्षणी वंचितकडून काँग्रेसला दणका, १६ वॉर्डमध्ये उमेदवारच नाही; इच्छुकांचा संताप

SCROLL FOR NEXT