Karnataka Crime  Saam Tv
क्राईम

Crime: गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला रॉकेल ओतून जिवंत जाळलं; प्रपोज करते म्हणत खुर्चीवर बसवलं, डोळ्यांवर पट्टी अन् हात-पाय बांधले नंतर...

Girlfriend Sets Boyfriend on Fire: कर्नाटकमध्ये प्रेमाचा भयंकर शेवट झाल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणीने बॉयफ्रेंडला पेट्रोल ओतून जिवंत जाळलं. प्रपोज करते म्हणत घरी बोलावलं नंतर हात-पाय बांधून पेटवून दिलं.

Priya More

Summary -

  • बंगळुरूमध्ये गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या

  • प्रपोज करण्याचे कारण सांगून घरी बोलावले

  • खुर्चीवर बसवून हात-पाय बांधले

  • रॉकेट टाकून बॉयफ्रेंडला जिवंत जाळले

कर्नाटकातल्या बंगळुरूमध्ये गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या केली. लग्नासाठी प्रपोज करते म्हणत तिने बॉयफ्रेंडला घरी बोलावले त्यानंतर त्याला जिवंत जाळले. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी गर्लफ्रेंडला पोलिसांनी अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे कर्नाटकात खळबळ उडाली आहे.

किरण (२७ वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. तर प्रेरणा असं आरोपी तरुणीचे नाव आहे. किरण आणि प्रेरणा दोघे एकाच टेलीकॉम स्टोअरमध्ये एकत्र काम करत होते. दोघांचे गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. पण प्रेरणा गेल्या काही दिवसांपासून किरणवर नाराज होती. किरण तिच्याकडे दुर्लक्ष करत असून तो तिच्यासोबत लग्न करणार नाही असे तिला वाटत होते त्यामुळे तिने त्याची हत्या केली.

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी प्रेरणाने किरणला दक्षिण बंगळुरूमधील आपल्या घरी बोलावले. त्यावेळी घरामध्ये प्रेरणा एकटीच होती. तिची आई आणि भाऊ बाहेर गेले होते. किरण घरी आल्यानंतर तिने काहीवेळ त्याच्यासोबत गप्पा मारल्या. त्यानंतर तिने किरणच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्याला एका खुर्चीवर नेऊन बसवले. नंतर हात-पाय बांधण्यास सुरूवात केली. त्यावेळी किरणने तिला विरोध केला. तर प्रेरणाने त्याला सांगितले की, मला तुला एका खास पद्धतीने प्रपोज करायचा आहे जो परदेशात खूपच प्रसिद्ध आहे.

त्यानंतर प्रेरणाने किरणच्या अंगावर रॉकेल ओतले आणि पेटवून दिलं. आग लागल्यानंतर किरण जोरजोरात ओरडत होता. मदतीसाठी विनवणी करत होता. किरण आग लागल्यानंतर तडफडत होता तेव्हा प्रेरणा त्याचा व्हिडीओ बनवत होती. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रेरणाविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली. पोलिस सध्या तिची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी; मुरूम-तुगाव परिसर झोडपला

काही जण जेलमध्ये तर एकनाथ शिंदे हिमालयात निघून जातील; ठाकरेंच्या नेत्याच्या व्यक्तव्याने भुवया उंचावल्या

रोहित शर्मा, हार्दिक पंड्याला अल्टिमेटम; भारतीय संघात सिलेक्शनसाठी १ अट पूर्ण करावी लागणार

Crime News: गांजाची नशा डोक्यात गेली; प्रायव्हेट पार्ट कुऱ्हाडीनं छाटलं अन् विहिरीत फेकलं, शुद्धीवर आल्यावर तरुण म्हणाला...

VIP असो की सरकारी अधिकारी, महामार्गावर टोल लागणार; सरकार बदलणार नियम

SCROLL FOR NEXT