कामशेत बाजारपेठेत पोलीसांनी मोठी कारवाई करत तीन ठिकाणांहून तब्बल दोन लाख 53 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला जप्त केला आहे. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक (satya sai karthik) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (Maharashtra News)
सत्यसाई कार्तिक यांना कामशेत बाजारपेठमध्ये काही ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला इ. ची अवैधपणे विक्री होत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या कार्यालयातील पथक व कामशेत पोलीस स्टेशनच्या पथकाने शिताफीने सापळा रचून कामशेत बाजारपेठेत धडक कारवाई केली.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार भरत चंपालाल जैन यांच्या मे. शिवम टेडर्स, घिसाराम सुखराज चौधरी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामशेत येथील मेढो मेडीकलचे बाजुस असलेल्या किराणा दुकानामधून व राहते घरातून आणि महावीर सुखराज जैन यांच्या भोला ट्रेडर्स या दुकानामधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला पदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.