Kalyan News Saam Tv
क्राईम

Crime News : कल्याणमध्ये मुलीला भेटायला आली, रिक्षाचालकाने महिलेला फसवले, तब्बल ₹३५०००० लाख सोनं लंपास केले

Kalyan Crime News : कल्याणमध्ये कोकणातून आलेल्या महिलेची साडेतीन लाखांच्या दागिन्यांची बॅग रिक्षात विसरली गेली आणि रिक्षाचालक ती घेऊन फरार झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काही तासांत आरोपीला अटक केली.

Alisha Khedekar

कल्याणमध्ये रिक्षाचालकाने महिलेची मौल्यवान बॅग लंपास केली

पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला काही तासांत अटक केली

आरोपीच्या रिक्षावर बोगस नंबरप्लेट असल्याचं उघड झालं

एकाच नंबरच्या दोन रिक्षा शहरात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

कल्याण मधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. कोकणातून कल्याणमध्ये आलेल्या महिलेची बॅग घेऊन रिक्षा चालक पसार झाला. धक्कदायक म्हणजे या रिक्षाचालकाच्या रिक्षावर बोगस नंबर असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान पोलिसांनी काही तासांच्या कालावधीत या रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून साडे तीन लाखांचे दागिने जप्त केले गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी कोकणातून आपल्या मुलींना दिवाळीचा फराळ देण्यासाठी आलेल्या महिलेने डोंबिवलीतील मुलीला भेटून कल्याण पूर्वेकडील दुसऱ्या मुलीकडे जाण्यासाठी निघाली. त्यासाठी सदर महिला ही शेअर रिक्षामध्ये बसली. त्यानंतर टाटा पॉवरजवळ उतरल्यावर काही वेळातच तिला आपली दागिन्यांची पिशवी रिक्षातच राहिल्याचे लक्षात आले.ज्यात साडेतीन लाखांचे दागिने व ३ तोळ्यांचे मंगळसूत्र होते. घाबरलेल्या महिलेने आपल्या मुलीला माहिती दिल्यानंतर तातडीने कल्याण गुन्हे शाखेशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रिक्षा शोधली, मात्र त्या रिक्षात बॅग आढळली नाही.

तसेच ज्या रिक्षात बॅग विसरली होती त्या रिक्षावर बोगस नंबरप्लेट असल्याची माहिती समोर .तपास पुढे नेत पोलिसांनी लक्षात आणले की, एकाच नंबरच्या दोन रिक्षा शहरात धावत आहेत.वाहतूक पोलीसांच्या मदतीने चलान शोधले .एका चलान मध्ये त्या रिक्षाचा नंबर आणि मोबाईल नंबर आढळला .मोबाईलच्या नंबर आणि तांत्रीक तपासाच्या आधारे टीटवाळा परिसरात संशयित चालक जयेश गौतम याच्यापर्यंत पोहोचले .

झडती घेतली असता घरातून बॅग आणि दागिने जप्त करण्यात आले. याचवेळी पोलिसांनी रिक्षाची नंबरप्लेट तपासली असता ती बोगस असल्याचे उघड झाले. आरोपीला अटक करून रिक्षा व दागिन्यांची बॅग ताब्यात घेण्यात आली आहे.या घटनेनंतर एकाच नंबरच्या एकापेक्षा जास्त रिक्षा शहरात धावत असल्याचा धक्कादायक मुद्दा ऐरणीवर आला असून, वाहतूक पोलिस आणि आरटीओ विभागाच्या देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्डर लॉंचिंग; मध्यरेल्वेचा आज रात्री ब्लॉक

Mix Dal Dosa Recipe: घरीच बनवा मिक्स डाळींचा पौष्टिक डोसा; नाश्त्यासाठी हेल्दी अन् टेस्टी ऑप्शन

एका मिनिटात उमेदवार जाहीर करीन!सुनील शेळके यांचा भाजपला इशारा; राजकारणात खळबळ|VIDEO

Bhakri Tips: ज्वारीची भाकरी थंड झाल्यावर कडक होतेय? 'या' सोप्या टीप्सने भाकरी होईल अगदी कापसासारखी लुसलुशीत

Andheri Fire News: वर्सोवा गावातील दुकानाला भीषण आग, आगीत अनेक वस्तू जळून खाक

SCROLL FOR NEXT