Saam Tv
क्राईम

Shocking : चाकूने सपासप वार करत बायकोला संपवलं, नंतर स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल; कल्याण हादरलं!

Kalyan Crime News : कल्याणध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर चाकूने वार करून हत्या केली. या हत्येनंतर पतीने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

कल्याणमधील वरप गावात पतीने पत्नीवर चाकूने वार करून हत्या केली

संतोष पोवले यांनी चारित्र्याच्या संशयातून विद्याचा जीव घेतला

घटनेनंतर संतोषने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला

आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

मुंबईतील काळाचौकीमधील घटना ताजी असताना कल्याणमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर सपासप चाकूने वार करून हत्या केली आहे. धक्कदायक म्हणजे या हल्ल्यानंतर पटीने स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केले आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संतोष पोवले असे आरोपी पतीचे नाव असून मृत पत्‍नीचे नाव विद्या पोवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणजवळील वरप गावात राहत असलेल्या संतोष आणि विद्या यांच्यात गुरुवारी उशिरा रात्री वाद झाला. संतोषने विद्याच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने या दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या संतोषने विद्यावर हल्ला चढवला. यानंतर संतोषने स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला.

विद्याचा आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी घरात धाव घेतली आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी विद्याला मृत घोषित केले. तसेच संतोष गंभीर जखमी अवस्थेत उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. पोलिसांनी संतोष विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घटनेनंतर वरप परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत कौटुंबिक कलह आणि चारित्र्य संशय हेच या दुर्दैवी घटनेचे धक्कदायक कारण असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील काळाचौकी परिसरात अशाच प्रकारे घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान

Wedding Look: या लग्नसराईसाठी जान्हवीचे 'हे' देसी लूक ट्राय करा, तुम्हीही दिसाल ग्लॅमरस आणि अट्रॅक्टिव्ह

Liver Cancer Risk: कंबरदुखी वाढत चाललीये? लिव्हर कॅन्सरचा धोका नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Pune : पुण्यात भयंकर हत्याकांड, बिझनेसमनने बायकोचा गळा दाबला, भट्टीमध्ये बॉडी जाळली, अन् राख....

SCROLL FOR NEXT