Kalyan Dombivli News Saam Tv
क्राईम

Kalyan Dombivli Crime : दादा, भाईंची आता खैर नाही! नाशिकनंतर कल्याण डोंबिवलीत पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

Kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवली परिसरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २४० अधिकारी-कर्मचारी क्षेत्रात उतरले असून रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे.

Alisha Khedekar

कल्याण डोंबिवलीत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याने पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले

२४० अधिकारी कर्मचारी क्षेत्रात उतरले असून रात्रीची गस्त वाढवली आहे

डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू करण्यात आली आहे

नागरिकांमध्ये पोलिसांच्या उपस्थितीमुळे सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे

कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढल्या आहेत. ऐन दिवाळीत हाणामारीची अनेक प्रकारांबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या गुन्हेगारी वृत्तीला चाप बसविण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. शिवाय या प्रकारचे गुन्हे टाळण्यासाठी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऐन दिवाळी सणात कल्याण परिमंडळ ३ मध्ये किरकोळ वादातून अनेक गुन्हेगारी वृत्त मारझोड, दगडफेक त्याच प्रमाणे दोन गटात हाणामारीचे प्रकार घडले आहेत. या गुन्हेगारी वृत्तीला चाप बसविण्यासाठी आता पोलिसांनी खाक्या दम द्यायला सुरुवात केली आहे. कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शनिवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. परिसरातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसावा, तसेच नशेखोर आणि सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

या ऑपरेशनमध्ये २४० अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले असून, त्यांनी शहरातील स्टेशन परिसर, मोकळी मैदाने, गल्लीबोळ आणि संशयास्पद ठिकाणांवर सखोल तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणी संशयित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून, नशेखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे.

गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे स्वतः रस्त्यावर उतरले असून, त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि क्षेत्रातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कॉम्बिंग ऑपरेशनमुळे परिसरात पोलीसांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढली असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. परिमंडळ तीनचे पोलिस आता पूर्णपणे ऍक्शन मोड वर असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

Maharashtra News Live Update: अक्षयतृतीयाला गौराईचे वाजत-गाजत विसर्जन,आदिवासी परंपरा

विदर्भ भाजतोय! अकोला-वर्ध्यात तापमान ४५° पार, उष्णतेचा कहर

कोलकात्यात रिंकू सिंहचं वादळ, KKRने मिळवला पहिला विजय; अतितटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स पराभूत

Gold Rate: सोनं २ लाखांवर पोहोचणार? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT