Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: कल्याण पूर्वमध्ये राडा; क्षुल्लक वादातून तरूणाला भोसकलं, चार जखमी

Youth Killed In Knife Attack: कल्याण पूर्वमध्ये क्षुल्लक वादातून तरूणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rohini Gudaghe

अभिजित देशमुख

Kalyan Crime News

कल्याण पूर्वेच्या (kalyan) चेतना ते आडीवली परिसरात दोन गटात झालेल्या वादाचं रूपांतर रक्तरंजीत राड्यात झालं. ही धक्कादायक घटना सोमवारी (१८ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तरुणांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर तीनजण जखमी झाले आहेत. एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला आवाज देत थांबण्यास सांगितलं होतं. तो तरुण आवाज ऐकूनही थांबला नाही. आवाज देणाऱ्या तरूणाने संतापून त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. (Latest Crime News)

या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी (Manpada Police Station) काही तरुणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. कल्याण पूर्वेमधील जय मल्हार हॉटेलसमोर काही तरुण उभे होते. यादरम्यान प्रेम भोवाड हा तरुण मित्र यश गुप्ता आणि राहूल केणेसोबत जात होता. या तिघांना जनकल्याण खाजगी रुग्णालयात जायचं होतं. मात्र, जय मल्हार हॉटेलसमोर उभे असलेल्या तरुणांनी या तिघांना थांबण्यास सांगितलं. परंतु ते तिघेही न थांबता थेट रुग्णालयात गेले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरूणावर चाकूहल्ला केला

रुग्णालयातून ते तिघे पुन्हा त्याच रस्त्याने परतत होते. तेव्हा त्यांना रस्त्यात योगेश पटेलने (बांधकाम व्यावसायिक) (Youth Killed In Knife Attack) मित्र राहूल पाठक आणि संतोष यादव यांच्यासह प्रेम आणि यश या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

कसाबसा यश त्यांच्या तावडीतून सूटला अन् तो घरी पळाला. योगेश पटेलने त्याच्या साथीदारांना घेऊन यशचं घर (Crime News) गाठलं. घरासमोरच त्याने यशच्या छातीत चाकू भोकसला. यावेळी यशचा भाऊ जिगर हा मधे पडला असता त्याच्या मानेवार आरोपीने चाकूने वार केले. यामध्ये जिगर गंभीर जखमी झाला. तर यश गुप्ताचा जागीच मृत्यू झाला आहे.

किरकोळ कारणातून वाद

या हाणामारीत आरोपी योगेश पटेल आणि संतोष यादव हे देखील जखमी झाले (Knife Attack) आहे. या दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. मात्र, एका किरकोळ कारणातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. चेतना ते आडीवली परिसर सध्या वादग्रस्त ठरत आहे.

या रस्त्यावर रात्रीच्या वेळी टोळक्यांची गर्दी असते. रात्री भररस्त्यात या टोळक्यांचा धिंगाणा सुरु असतो. अनेकदा दारूच्या नशेत या टोळक्यांकडून रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मारहाण देखील केली (kalyan Crime News) जाते. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. रात्री अपरात्री दहशत पसरवणाऱ्या या टोळक्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला धमकी, २ कोटी दे नाहीतर...

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Rahul Gandhi: राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू, भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धमकी; VIDEO ने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT