कल्याणमध्ये (Kalyan Crime) प्रेमप्रकरणातून एका तरुणाचं अपहरण करुन त्याला कोंडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण ग्रामीणमधील देवा ग्रुपने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मारहाण झालेल्या तरुणावर कल्याणच्या मीरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचं कुटुंब भीतीच्या वातावरणात आहे. (Latest Crime News)
या तरुणाच्या संपूर्ण कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आलीय. याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस (khadakpada police) ठाण्यात संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तरूणाचं अपहरण केलं
मुलाचे वडिलांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा कबीरचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध (Love Affair) आहेत. आम्ही दोन्ही कुटुंबियांनी बसून मुलीसह मुलाची समजूत काढली होती. परंतु मुलगी ऐकण्यास तयार नव्हती. ती अजुनही कबीरच्या संर्पकात आहे.
टिटवाळा परिसरात कबीर त्याचा भाऊ व काहीजण फिरत होते. तेव्हा अचानक मुलीचा मामा आणि काही इतर तरुण आले. कबीरचं पाच जणांनी अपहरण केलं. त्याला ते घेऊन गेले. बाकीच्या चार जणांना सोडून (Uncle kidnapped And Beat lover) दिलं. मात्र त्यांनी कबीरला बेदम मारहाण केली. तो जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी सूत्रं हलवली. याची मिळताच अपहरण केलेल्या त्या तरूणांनी कबीरला खडकपाडा परिसरात जखमी अवस्थेत सोडून दिलं.
पोलिसांमुळे वाचला तरूणाचा जीव
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने कबीरचा जीव वाचला आहे. या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत. या घटनेमुळं कबीरच्या कुटूंबात भीतीचं (Crime news) वातावरण आहे.
या प्रकरणी खडकपाडा पोलीस कसून तपास करत आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळेच या तरूणाचा जीव वाचला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.