Kalyan Crime Branch solved the sensational Pendya Bhai murder case 
क्राईम

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Kalyan Crime : कल्याण गुन्हे शाखेने 'पेंड्या भाई' हत्याकांडाचा खळबळजनक गुन्हा अवघ्या ३६ तासांत उघडकीस आणला. चाकूने केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.

Bharat Jadhav

  • अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाई यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

  • हल्लेखोरांनी पेंद्या भाई यांच्यावर 16 वार केले

  • 36 तासांत आरोपींचा शोध लावला.

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात घडलेल्या पेंद्या भाई हत्याकांडाचा कल्याण गुन्हे शाखेने अवघ्या 36 तासांत छडा लावला. अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाई याची प्रेयसीसमोरच 16 वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी त्याच्या प्रेयसीवरही चाकूने वार करत गंभीर जखमी केले होते.

या हत्याकांडानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-03 ने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून गुप्त माहितीच्या आधारे तीन आरोपींना अटक केली असून अविनाश लल्लन झा, कल्पेश मढवी आणि करण गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या या सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार गटात मोठा फेरबदल होणार; महिला अध्यक्ष बदलणार, नावही ठरलं

Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

मच्छिमारांना मिळणार थेट 20-22 हजार रुपये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल

लालबाग मंडळाची VIP संस्कृती पुन्हा वादात, भाविकांना धक्काबुक्की, व्हीआयपींना लोटांगण

SCROLL FOR NEXT