Jharkhand Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : धक्कादायक! तीन दिवस बंदिस्त केलं, निर्जनस्थळी नेऊन १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

Jharkhand Crime News : झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला तीन दिवस ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींपैकी तिघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Alisha Khedekar

  • झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  • तीन दिवस ओलीस ठेवून मुलीवर सामूहिक बलात्कार

  • या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींपैकी तिघांना अटक केली

  • इतर आरोपींचा शोध सुरू आहे

झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे सहा आरोपींनी अल्पवयीन मुलीला तीन दिवस बंदी बनवून ठेवले आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींपैकी तिघांना अटक केली असून इतरांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकुर जिल्ह्यातील मालपहारी ओपी भागातील एक १५ वर्षीय मुलगी तिच्या गावातील एका दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. तिथे आधीच उपस्थित असलेल्या सहा तरुणांनी तिला जबरदस्तीने एका ट्रकमध्ये ओढत नेवून जबरदस्ती बसवले. तसेच तिला धमकावून एका निर्जन ठिकाणी नेले आणि ओलीस ठेवले. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर तीन दिवस सामूहिक बलात्कार केला.

त्यानंतर मुलीला निर्जनस्थळी सोडून तरुणांनी पळ काढला. मुलीच्या घरच्यांनी ती बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांत दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. तपासादरम्यान पीडित मुलगी नको त्या अवस्थेत जखमीरीत्या निर्जनस्थळी सापडली. पोलिसांनी मुलीची विचारपूस केली असता तिने घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना सविस्तर सांगितलं.

मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि या प्रकरणाशी संबंधित सहा आरोपींपैकी तिघांना अटक केली. तसेच पोलीस इतरांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदूरबारमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या 'मिलेट चॉकलेट'मध्ये किडे आणि अळ्या

Second hand car: सेकंड हँड गाडी घेताय? या गोष्टी नीट तपासून पाहाच

Teacher Transfers: शिक्षकांना मूळ गावी बदली नाहीच; बदलला बदलीचा नियम, सरकारचा मोठा निर्णय

Weight Loss: ना जिम ना कठोर डाएट; पैसे खर्च न करता करा वजन कमी, जाणून घ्या हा फायदेशीर उपाय

Birth Certificate : फक्त १० रूपयांत कोणत्याही वयात मिळवा जन्म दाखला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT