Jalna Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : संतापजनक! चौथीत शिकणाऱ्या मुलीवर वर्गशिक्षकाने केले अत्याचार, ग्रामस्थांनी चोपला!

Jalna Crime News : जालनाच्या शेवगा गावामध्ये एका शिक्षकाने त्याच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केले. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शिक्षकाला बेदाम मारहाण करुन पोलिसांच्या ताब्यात दिले.

Yash Shirke

अक्षय शिंदे पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Jalna News : जालन्यामध्ये एका शिक्षकाने त्याच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही विद्यार्थिनी इयत्ता चौथीमध्ये शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वर्गशिक्षकावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील शेवगा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा अत्याचाराचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी वर्गशिक्षकाला बेदम चोप दिला आणि मौजपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाचा तपास मौजपुरी पोलीस करत आहेत.

जालन्यातील शेवगा गावात एका चौथीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिच्या वर्गशिक्षकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्षकाच्या विरोधात मौजपुरी पोलीस ठाण्यामध्ये पॉस्कोसह इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या शिक्षकाच्या विरोधात गावामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या शिक्षकाचे निलंबन केले जावे असे ग्रामस्थ म्हणत आहेत. घटनेचा अहवाल पोलिसांकडून मागवून शिक्षण विभागाकडे देणार असून, शिक्षकाच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शेवगा गावच्या ग्रामस्थांकडून सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

SCROLL FOR NEXT