Jalna Crime News  Saam Tv
क्राईम

Jalna Crime: किरकोळ वादातून भयंकर कांड! चाकूने भोसकून मित्रानेच मित्राला संपवलं; जालना हादरलं

Maharashtra Breaking News: जालन्यात किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. सैय्यद नदीम सैय्यद रहीम असे या मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चंदनझीरा पोलिसांन दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Gangappa Pujari

अक्षय शिंदे| जालना, ता. २८ जून २०२४

किरकोळ वादातून मित्रानेच मित्राला चाकूने भोसकून संपवल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. जालन्याच्या चंदनझिरा भागात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालन्यात किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. सैय्यद नदीम सैय्यद रहीम असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहरातील चंदनझिरा परिसरात ही घटना घडली.

सैय्यद नदीम सैय्यद रहीम या तरुणाची किरकोळ कारणावरून आपल्या मित्रांशी बाचाबाची झाली. याच वादातून त्याचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. या खूनप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी दोन संशयीत आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चंदनझीरा पोलिसांन दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नाशिकमध्ये गावगुंडांची दहशत!

नाशिकमधील म्हसरूळ परिसरात गावगुंडांची दहशत माजवली आहे. दोन टवाळखोरांनी तलवारीने पान टपरी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली अशून कथित भाईला पानटपरी चालक ओळखत नसल्याच्या रागातून पान टपरी फोडल्याचे सांगण्यात येत आहे. दहशत निर्माण करणाऱ्या संशयित टवाळखोरांना म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT