Mumbai Crime News Saam tv
क्राईम

Jalgaon Crime: धान्य व्यापाऱ्याच्या पत्नीची निर्घृण हत्या; जळगाव हादरलं

Maharashtra Crime: सुवर्णा नवाल पतीसह रणछोड नगरात राहत होत्या. त्यांचे पती धान्याचे व्यापारी आहेत. सुवर्णा नवाल घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून खून केलाअ सल्याचं बोल जात आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हत्यांच्या घटनांचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच अमरावती शहरामध्ये चार दिवसांमध्येच चार हत्यांच्या घटना समोर आल्या होत्या. अशातच आता जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव शहरात एका महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगावच्या रणछोड नगरामध्ये एका महिलेच्या डोक्यात हत्याराने वार करून निघृण खून केल्याची घटना रात्री सुमारास उघडकीस आली. सुवर्णा राजेश नवाल असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुवर्णा नवाल पतीसह रणछोड नगरात राहत होत्या. त्यांचे पती धान्याचे व्यापारी आहेत. सुवर्णा नवाल घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून खून केलाअ सल्याचं बोल जात आहे.

त्यांचे पती घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला या संदर्भात कोणतीही माहिती नाही प्राथमिक चौकशीत पोलिसांना मिळालेली नाही. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, यवतमाळमधून एक मोठी घटना समोर आली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यात यवतमाळ येथील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींमध्ये रात्री दरम्यान हाणामारी झाली यामध्ये कैदी पुंडलिक राठोड गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात सात कायदा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

मोठी बातमी! राज्यात तब्बल १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; किती जणांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार?

SCROLL FOR NEXT