Jalgaon crime news Saam tv
क्राईम

Jalgaon Crime: पोटच्या मुलीसोबत आईने उचललं टोकाचं पाऊल, घरात आढळले मृतदेह; नेमकं काय घडलं?

Jalgaon: जळगावच्या एरंडोलमध्ये राहणाऱ्या महिलेने नऊ वर्षाच्या मुलीसह राहत्या घरात आत्महत्या केली. महिलेचा भाऊ घरी आल्यावर हा प्रकार समोर आला.

Saam Tv

Jalgaon Crime: जळगावच्या एरंडोलमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एरंडोलमधील जहांगीरपुरा परिसरामध्ये एका विवाहित महिलेने आपल्या नऊ वर्षीय मुलीसह गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मानसिक तणावात असलेल्या महिलेने हा निर्णय घेतल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. ही घटना गुरुवारी (२६ डिसेंबर) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव सपना माळी (वयवर्ष ३३) असून तिच्या मुलीचे नाव केतकी माळी (वयवर्ष ९) आहे. घटनास्थळी तपासादरम्यान पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीमध्ये आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही असे नमूद करण्यात आले आहे. यावरुन मृत महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी ही चिठ्ठी लिहिल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सपना माळी या महिलेचा आठ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती आपल्या मुलीसह माहेरी राहायला आली होती. या दोघी माय-लेकी एरंडोलमधील महादेव मंदिर परिसरात वास्तव्याला होत्या. सपनाचा भाऊ दुपारी त्यांच्या घरी आल्यावर ही घटना समोर आली. त्यानंतर घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपास केला. आत्महत्यामागे मानसिक तणाव असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

आठ वर्षांपूर्वी सपनाचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती मानसिक तणावात होती. मानसिक तणावामुळे तिने राहत्या घरात पंख्याला गळफास लावून घेतल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जळगावमधील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT