Crime News
Crime News Saam Tv
क्राईम

Jaipur Crime News: क्रिकेटमधील पराभवानंतर तरुणाचा राग अनावर; मित्राच्या डोक्यात केला बॅटने हल्ला; जयपूरमधील घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jaipur 15 Year Old Boy Killed By His Friend After Loss In Cricket Match:

जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूरमध्ये क्रिकेटमध्ये हरल्यामुळे एका मुलाने दुसऱ्या संघातील १५ वर्षीय मुलाच्या डोक्यात बॅटने हल्ला केला. यात त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मंगळवारी झालावाडच्या भवानी मंडी येथे दोन संघांमध्ये क्रिकेट सामना सुरु होता. क्रिकेट सामना हरल्यामुळे एकाचा राग अनावर झाला आणि त्याने दुसऱ्या मुलाच्या डोक्यात बॅटने हल्ला केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश साहू हे मृत मुलाचे नाव आहे. तर मुकेश मीना (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. तो भवानी मंडी येथील राजस्थान टेक्स्टाईल्स मिल्स लेबर कॉलनीत राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हा दहावीत शिकत होता. तर मुकेश मीना बीएच्या अंतिम वर्षात होता. हे दोघेही मित्र होते. हे रोज कॉलनीतील मैदानात क्रिकेट खेळायला जायचे.

मंगळवारी दुपारी प्रकाश आणि मुकेशच्या दोन संघामध्ये क्रिकेटचा सामना रंगला. त्यात प्रकाशचा संघ जिंकला आणि मुकेशची टीम हरली. आपली टीम हरल्यामुळे मुकेशला राग आला त्याने रागाच्या भरात प्रकाशच्या डोक्यावर बॅटने हल्ला केला. यात प्रकाश जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कॉलनीत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: रॉग साईंडनं आलेल्या ट्रकनं कारला चिरडलं; कारचा चुराडा

Beed News : गाढ झोपेतच मृत्यूने गाढले; अंगावरून डंपर गेल्याने २ तरुणांचा मृत्यू

Andaman Monsoon News | अंदमानात मान्सूनची हजेरी,नागरिकांना दिलासा!

IPL 2024 Playoffs: RCB चा संघ प्लेऑफमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? समजून घ्या समीकरण

Health Tips: तुम्हाला पण आंबट ढेकर येत आहेत का? ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT