Jaipur Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : पोलिस अधिकाऱ्याकडून तरुणीवर बलात्कार, स्पर्धा परिक्षेच्या तयारीत मदत करतो म्हणाला, हॉटेलवर नेलं अन्....

Jaipur Crime News : जयपूरमध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • जयपूरमध्ये धक्कादायक प्रकरण उघड

  • पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

  • लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचं शोषण केल्याचा आरोप

  • पीडितेच्या तक्रारीनंतर कारवाई

  • महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत

जयपूरमध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत करण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जलुपुरा पोलीस ठाण्याने एका पोलीस अधिकाऱ्याला अटक केली असून आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी पप्पुलाल बैरवा हा मूळचा राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या जोधपूर ग्रामीण पोलीस लाइनमध्ये कार्यरत होता. पीडित तरुणी आणि आरोपी हे शेजारील गावांचे रहिवासी असल्याने त्यांच्यात आधीपासून ओळख होती. आरोपीने तरुणीला स्पर्धा परीक्षांच्या तयारीत मदत करतो सांगून जयपूरला बोलावले. त्याने तिची राहण्याची व्यवस्था भाड्याच्या खोलीत केली. या काळात दोघांमध्ये जवळीक वाढली आणि आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन दिले. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी तिला विविध बहाण्यांनी सिंधी कॅम्प परिसरातील हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर जबरदस्ती करत असल्याचा आरोप आहे. तरुणीने विरोध केल्यावर तो पुन्हा लग्नाचे आश्वासन देत तिची समजूत काढत होता. अशा प्रकारे आरोपीने अनेक वेळा तिचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान, जेव्हा पीडितेने आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकला, तेव्हा त्याने नकार दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने २४ मार्च रोजी जलुपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आणि जबाब नोंदवला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. अखेर आरोपीला अटक करण्यात आली असून शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारात जाण्याची गरज नाही! घरच्या घरी कुंडीमध्ये उगवतील अशा ५ भाज्या; आजच सुरू करा किचन गार्डनिंग!

Maharashtra News Live Update: ‘टीईटी’ पेपरफुटी प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई

PM SVANidhi Yojana : फेरीवाल्यांसाठी खुशखबर! मिळणार ₹30,000 पर्यंत क्रेडिट कार्ड; 50 दिवस व्याज नाही

फ्लॅट मालकांसाठी मोठी बातमी! भाडेकरूने नियम मोडला तर दंड कोणाला भरावा लागणार? सोसायटीचा नियम ऐकून उडेल झोप

Mouth cancer: तोंडाचा कॅन्सर झालाय हे कसं ओळखाल? 'ही' 6 लक्षणं दिसली तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT