Husband Ran Away With Wife Sister in Law  Saam Tv News
क्राईम

Crime News : स्वत:च्या लग्नात मेव्हण्याच्या बायकोशी नजरानजर, महिन्याभरात तिच्यासोबत फरार; पत्नीला म्हणतो तुझी वहिनी जरा जास्तच...

Husband Ran Away With Wife Sister in Law : उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या एका महिन्यानंतरच पती हा पत्नीच्या वहिनीसोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Prashant Patil

गोंड : उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या एका महिन्यानंतरच पती हा पत्नीच्या वहिनीसोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचं त्याचा मेव्हण्याच्या बायकोवरच जीव जडला. त्यामुळे स्वत:च्या पत्नीला सोडून तो तिच्या वहिनीलाचा घेऊन पळून गेला. या प्रकरणी पीडित पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील गोंड जिल्ह्यातील धानेपूर पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जो तरुण आपल्या मेव्हण्याच्या बायकोसोबत पळून गेला, त्याच्या लग्नाला फक्त एकच महिना झाला आहे. गेल्या महिन्यात ६ मे रोजी तरुणाचं लग्न झालं होतं. लग्नादरम्यानच तरुणाची आपल्या मेव्हण्याच्या बायकोशी नजरानजर झाली आणि तिथेच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. ज्यानंतर मेव्हण्याच्या बायकोने पळून जाण्याचा कट रचला.

पोलीस तक्रारीनुसार, ७ जून रोजी तरुण पत्नीच्या वहिनीसोबत पळून गेला. याबाबत जेव्हा नवविवाहित महिलेला समजलं तेव्हा तिने तात्काळ धानेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ज्यामध्ये तिने सांगितलं की. 'गेल्या महिन्यात ६ मे रोजी धानेपूर येथे एका गावात तिचं लग्न झालं होतं. तिच्या वडिलांनीही त्यांच्या ऐपतीनुसार, पैसा आणि हुंडा दिला होता. लग्नानंतर महिला सासरी आली. पण तिचा पती आणि इतर सासरच्या लोकांनी कमी हुंडा आणल्याबद्दल तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली.'

नवविवाहित महिलेने यावेळी असाही आरोप केला की, 'तिच्या सासरकडील लोकांनी तिला अपशब्द वापरत मारहाणही केली. ३० मे रोजी तिच्या सासरकडील लोकांनी तिला मारहाण केली आणि तिचं माहेर असलेल्या नजीकच्या बाजारात तिला सोडून दिलं. त्यानंतर ती बिकट परिस्थितीत तिच्या माहेरी पोहोचली आणि उपचार घेतले.' यानंतर पीडित महिलेने पोलिसांना असंही सांगितलं की, 'तिचा पती तिला सोडून तिच्या वहिनीसोबत कुठेतरी पळून गेला आहे. पती नेहमी माझ्या भावाच्या बायकोचं म्हणजे वहिनीचं कौतुक तिच्याकडे करायचा. ती कशी चांगली आहे हे तो बोलत असायचा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khekda Bhaji Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत खेकडा भजी, मुसळधार पावसात करा चटपटीत नाश्ता

Maharashtra News Live Update: येवला-मनमाड रोडवर टू व्हीलरला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रूजर गाडी गेली खड्ड्यात

नाशिक रिंगरोडची अलाईनमेंट बदलली? IAS अधिकाऱ्यांची होणार चौकशी, खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकारचा निर्णय

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

ATM air conditioner: एटीएम मशीनमध्ये एसी का लावलेला असतो?

SCROLL FOR NEXT