hingoli News
hingoli News saam Tv
क्राईम

Hingoli News: मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र संपेना, हिंगोलीतील १८ वर्षीय तरुणीने संपवलं जीवन

संदीप नांगरे

Hingoli News:

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मात्र, आरक्षणासाठी जीवन संपवण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. हिंगोलीमध्ये एका तरुणाने आणि तरुणीनेही आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडलीय.(Latest News)

हिंगोली येथील माळधामणी गावात एका १८ वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केली. आरती नागोराव शिंदे, असे आत्महत्या करणाऱ्या या तरुणीचे नाव आहे. तर नाहाद गावातील एका २१ वर्षीय तरुणानेही आरक्षणासाठी विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं. गोविंद सोनाजी कावळे या तरुणाचे नाव आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आरतीने आत्महत्या केल्याचा दावा मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केलाय. राज्याचे गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी केलीय. मृत तरुणीच्या कुटुंबीयांसह गावातील नागरिकांनी कळमनुरी शासकीय रुग्णालयासमोर ठिय्या मांडला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील नाहाद गावात २१ वर्षाचा तरुणाने विहिरीत उडी मारून जीवन संपवलं. या तरुणाने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आलीय. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नाहाद गावासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती सध्या पोलीस व ग्रामस्थ या तरुणाचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video: शिवाजी पार्कवर मोदींचं स्वागत होत असताना राज ठाकरेंची बॉडिलॅग्वेज कशी होती?

Nagpur Crime : जुन्या वादातून युवा कॅबचालकाचा खून, दाेघांवर गुन्हा दाखल

Pani Puri: घरच्या घरी बनवा टम्म फुगलेली पाणीपुरी, सोपी रेसीपी

Actor Chandrakanth Dies : जवळच्या मैत्रिणीचा कार अपघातात मृत्यू, नैराश्यात बुडालेल्या अभिनेत्याने संपवलं जीवन

Raj Thackeray यांचा हात धरला, त्यांना पुढे आणलं! Devendra Fadnavis यांची कृती चर्चेत, Video पाहिलात?

SCROLL FOR NEXT