Crime News saam tv
क्राईम

Crime News: जगण्यापेक्षा मरण बरं..; ६७ वर्षांच्या वृद्धाने मृत्यूला कवटाळलं, ५ व्या मजल्यावरून मारली उडी

Haryana Crime : हरियाणातील फरिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. फरीदाबाद येथील सेक्टर ८८ येथील एसआरएस हिल्स सोसायटीमध्ये राहणाऱ्या ६७ वर्षीय व्यक्तीला त्याच्या मुलाने आणि सुनेने चप्पलने मारहाण केली.

Bharat Jadhav

एका ६७ वर्षीय व्यक्तीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना हरियाणामधील फरिदाबादच्या एसआरएस हिल्समध्ये घडलीय. येथील ८८ सेक्टरमध्ये राहणाऱ्या एका वृद्धाने अपमान सहन न झाल्यानं आत्महत्या केली. कुबेरनाथ शर्मा असं आत्महत्या करणाऱ्या या ६७ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.

कुबेरनाथ शर्मा यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना चप्पलने मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळलं. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याआधी त्यांनी सुसाईट नोट लिहिली होती. ही चिठ्ठी त्यांनी आपल्या खिशात ठेवली होती. आत्महत्या केल्यानंतर पंचनामा करताना पोलिसांना वृद्धाच्या खिशात सुसाईड नोट सापडली. याच्या आधारे भुपानी पोलिसांनी आरोपी दाम्पत्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी येथील पोलीस अधिकारी एसएचओ संग्राम दहिया यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा विविध पैलूंनी तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी रोजी एसआरएस हिल्समध्ये मुलगा आणि सुनेसोबत राहणारे ६७ वर्षीय कुबेरनाथ शर्मा यांचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. यानंतर पोलीस या प्रकरणाला आत्महत्या असल्याचं म्हटलं.

मुलाकडे राहण्यासाठी आले होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एएसआय जमशेद अली असे तक्रारदाराचे नाव आहे. ते या प्रकरणाचे तपास अधिकारीही आहेत. तपासादरम्यान कुबेरनाथ शर्मा हे एका खासगी कंपनीत कामाला होते. तेथून निवृत्त झाले होते. शर्मा कंपनीत फोरमॅन म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, कुबेरनाथ शर्मा हे शहरात तीन वर्षांपूर्वी आपल्या पत्नीसह मोठ्या मुलाकडे राहण्यास आले होते. घटना घडली तेव्हा त्यांची पत्नी बाहेर गावी गेली होत्या. दरम्यान कुबेरनाथ हे आजारीदेखील होते.

सुसाईट नोट सापडली

कुबेरनाथ शर्मा यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली होती यात लिहिले होते- जगण्यापेक्षा मरण बरे वाटतंय. मी स्वतः आत्महत्या करत आहे, मला कोणीही ढकलले नाही. मुलगा आणि सून चप्पलेने मारतील, त्यामुळे जगण्यापेक्षा मरण बरे, यात कोणाचाही दोष नाही. सर्व काही देवाची इच्छा आहे, असं या चिठ्ठीत लिहिलं होतं.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आणि सून यांचीही चौकशी करण्यात आली. कुबेरनाथ शर्मा यांचा मुलगा आणि सुनेने चप्पलने मारहाण केल्याने अपमानित झाल्याने कुबेरनाथ यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुबेरनाथ यांच्या मुलाचा जबाब नोंदवलाय. यानुसार मुलाने सांगितलं की, ते दुपारी जेवणासाठी त्यांच्या वडिलांना शोधत होते.

तेवढ्यात खूप मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी धावत जाऊन पाहिले तर त्यांचे वडील रिकाम्या जागी उभ्या असलेल्या सायकलवरून पडलेले दिसले. कुबेरनाथ यांना मोठी दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान कुबेरनाथ यांचा मृत्यू झाला. कुबेरनाथ हे आजारी राहत होते, त्यामुळे आत्महत्येचा विचार करत असायचे असं मुलाने पोलिसांना सांगितले.

भुपानी पोलीस स्टेशनचे एसएचओ संग्राम दहिया यांनी सांगितले की, 22 फेब्रुवारी रोजी सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरून एक वृद्ध व्यक्ती पडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथे पुन्हा घटना कशी घडली असेल याची माहिती घेण्यात आली. यानंतर प्राथमिक स्तरावर गुन्हा दाखल करण्यात आला.

वृद्धाच्या खिशातून सापडलेल्या सुसाईड नोटची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाणार आहे. तपासादरम्यान हस्ताक्षर आदी तपासले जाईल. तपास अहवालात काय येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असं दहिया यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

SCROLL FOR NEXT