hadpsar police arrests two in money rain case  Saam Tv
क्राईम

Pune News : बाबा आईरा शाब बनावट नावाने भोंदूबाबाचा पुण्यात वावर, पैशांचा पाऊस प्रकरणी जगताप अटकेत

या प्रकरणातील संशयितांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Hadapsar News :

पैशाचा पाऊस पाडतो म्हणून १८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला व त्याच्या सहकार्याला अटक करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संशयिताचे नाव संजूबाबा उर्फ संजय भरत जगताप असे आहे. बाबा आईरा शाब या खाेट्या नावाने त्याचा वावर राहिला आहे. (Maharashtra News)

कोट्यावधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडतो असे सांगत विनोद छोटेलाल परदेशी यांची 18 लाखांची फसवणुक करणारा आणि पैसे घेऊन पळून गेलेल्या बाबा आईरा शॉब (Baba Ayra Shab) याच्यासह माधुरी मोरे (Madhuri More), रॉकी वैद्य (Rocky Vaidya) आणि किशोर पंडागळे (Kishor Pandagale) या चार जणांवर हडपसर पोलीसांत गुन्हा दाखल आहे. या घटनेचा पाेलिस तपास करीत हाेते.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बाबा आईरा शाब या अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीअंती बाबाचे खरे नाव संजूबाबा उर्फ संजय भरत जगताप असे आहे. हा बाबा बनावट नावाने जादूटोणा करीत असल्याचे समोर आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणातील दोन संशयितांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य चार संशयितांचा शोध सुरु असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT