Crime Saam Tv
क्राईम

Mumbai crime : गुजरातच्या व्यक्तीचा मुंबईत मृत्यू, अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवताना आला हार्ट अटॅक

Mumbai crime: मुंबईच्या ग्रँट रोडमधून एक मोठी आणि हैराण करणारी घटना घडली. अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर एका ४१ वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईच्या ग्रँट रोडमधून एक मोठी आणि हैराण करणारी घटना घडली. महाराष्ट्रातील मुंबईतील ग्रँट रोडमधील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर एका ४१ वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. सोमवारी पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

अधिकाऱ्यांनी काय दिली माहिती?

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हा व्यक्ती एका डायमंड कंपनीचा मॅनेजर होता. या मृत व्यक्तीवर १४ वर्षीय मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता आणि मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत बलात्कार आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही घटना शनिवारी घडली. तो मुलीला गुजरातमधून सोबत घेऊन आला होता. त्याची प्रकृती खालावल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेलं. यानंतर काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती असल्याचं, अधिकाऱ्यांनी सांगितलं.

डीबी मार्ग पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, माहिती मिळाल्यानंतर मुलीची आई मुंबईत आली, तिने आम्हाला सांगितलं की, त्या व्यक्तीने मुलीला खोटं आश्वासन देऊन मुंबईला आणलं. दरम्यान या प्रकरणाचा तपास अजून सुरु आहे.

मूळचा गुजरातचे असलेला तरुण आणि १४ वर्षांची मुलगी एकमेकांना ओळखत होते. मुलीच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्यापासून हा व्यक्ती मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होता. मुंबई फिरवतो असं सांगून त्याने मुलीला स्वतःसोबत आणलं होतं. तिच्या नावे बनवलेल्या बनावट आधार कार्डद्वारे तो मुंबईतील एका लॉजमध्ये थांबला होता.

यावेळी अल्पवयीन मुलीवर शारीरीक अत्याचार करताना तो अचानक बेशुद्ध पडला. त्यानंतर लॉज कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पण रुग्णालयात उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT