उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. लोनी बॉर्डर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिव वाटिका जवळच्या एका कालव्याजवळ एक हिरव्या रंगाचा सूटकेस आढळला. या सूटकेसमध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेचे वय २५-२६ वर्षे असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. स्थानिकांनी सूटकेसबाबतची माहिती पोलिसांना दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, बेहटा हाजीपूर ते बंधला या कॅनल रोडच्या कडेला एका हिरव्या सूटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने कालव्याजवळ सूटकेस टाकला होता. महिलेची ओळख अद्याप पटवता आलेली नाही. महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सूटकेसमध्ये मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या फील्ड युनिटला घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यानंतर फॉरेन्सिक टीमदेखील घटनास्थळी दाखल झाली. सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या पायात जोडव्या होत्या. तिच्या कपाळावर कुंकू देखील होते. यावरुन महिला विवाहित होती असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ज्या सूटकेसमध्ये महिलेचा मृतदेह होता, तो सूटकेस हिरव्या रंगाचा होता. महिलेची मान पूर्णपणे वळलेली होती. तिच्या नाकाला, तोंडाला रक्त होते. महिलेला मारहाण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याशिवाय तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असू शकतो असेही पोलिसांनी म्हटले आहे. महिलेचा मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाल्यानंतर सत्य समोर येईल, असे एसएपी अजय कुमार सिंह यांनी वक्तव्य केले आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले जात आहेत, अशी माहिती देखील एसएपी सिंह यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.