Gondia Crime News Saam TV
क्राईम

Gondia Crime News: चहाची तलफ जीवावर बेतली, मित्रांनीच जीवलग मित्राला संपवलं; भयानक घटना!

Gondia News Today: चहा टपरीवरील उधारीच्या वादातून तीन जणांनी मिळून आपल्याच मित्राची निर्घृणपणे हत्या केली आहे.

Satish Daud

हरीश मोटघरे, साम टीव्ही | गोंदिया ८ जानेवारी २०२४

Gondia Latest Marathi News

गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चहा टपरीवरील उधारीच्या वादातून तीन जणांनी मिळून आपल्याच मित्राची निर्घृणपणे हत्या केली आहे. मनिष भालधारे (वय २६) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संतोष मानकर, लोकेश मानकर, पवन मानकर, मोहित शेंडे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हत्येमध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष मानकर यांचे कुडवा (Gondia) येथे चहा नाश्त्याचे दुकान आहे.

मृत ईश्वर उर्फ मनीष भालाधरे याच्यावर आरोपी संतोष मानकर यांचे काही पैसे उधारी होते. जेव्हा संतोष मानकर त्याला पैसे मागायचा, तेव्हा मनीष हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. याशिवाय तो संतोषला जीवे मारण्याची (Crime News) धमकी सुद्धा देत होता.

दरम्यान, शनिवारी (६ जानेवारी) रात्री संतोष आणि मनीषमध्ये पुन्हा उधारीच्या पैशांवरुन वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला, की रागाच्या भरात आरोपी संतोष याने आपल्या मित्रांसोबत मनीषवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात मनीषचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, मनीषच्या हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर आरोपींच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली. रामनगर पोलिसांनी अवघ्या काही तासातच तीन आरोपींना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT