Telangana Crime News Saam TV
क्राईम

Crime News: आधी बहिणीला दारू पाजली, नंतर प्रियकराला रुममध्ये बोलावलं; तरुणीच्या कृत्याने पोलिसही चक्रावले

Telangana Crime News: लहान बहिणीने प्रियकरासोबत मिळून मोठ्या बहिणीसोबत असं काही कृत्य केलंय, जे पाहून पोलिसही चक्रावून गेलेत.

Satish Daud

Girl and her Boyfriend killed Elder Sister in Telangana

गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणातून खूनासारख्या भयानक घटना घडत आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे प्रेमप्रकरण तसेच अनैतिक संबंधातून घडत असल्याचं समोर आलं आहे. अशीच एक घटना तेलंगणातील जगितियाल जिल्ह्यात घडली आहे. लहान बहिणीने मोठ्या बहिणीसोबत असं काही कृत्य केलंय, जे पाहून पोलिसही चक्रावून गेलेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय घडलं?

२८ ऑगस्ट २०२३ रोजी पोलिसांना हैदराबाद येथील एका इमारतीत दीप्ती या तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. दीप्ती एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. प्राथामिक तपासानंतर तिची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना आला. (Latest Marathi News)

याप्रकरणी दीप्तीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली होती. दीप्तीची हत्या नेमकी कुणी केली असावी, असा प्रश्न पोलिसांसमोर होता. तब्बल ५ महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना दीप्तीचे मारेकरी शोधण्यात यश मिळालं. दीप्तीची हत्या तिच्या लहान बहिणीनेच केल्याचं पोलीस तपासात उघड झालं.

पोलिसांनी (Police) तातडीने तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आपणच प्रियकराच्या मदतीने दीप्तीची हत्या केल्याची कबूली चंदाने दिली. वास्ताविक चंदाचे सुलतान नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचीही जात वेगळी असल्याने दीप्तीचा त्यांच्या नात्याला विरोध होता.

सुलतानपासून दूर राहा, नाहीतर आई-बाबांना सर्व प्रकरण सांगेल, अशी धमकी दीप्तीने चंदाला दिली होती. यावरून चंदाला राग अनावर झाला. तिने २७ ऑगस्ट रोजी हैदराबाद मध्यरात्रीच हैदराबाद गाठले. दीप्तीच्या घरी गेल्यानंतर दोघांनी मिळून दारू पार्टी केली.

दीप्ती दारूच्या नशेत असल्याचा फायदा घेऊन चंदाने प्रियकर सुलतानला प्लॅटवर बोलावलं. नंतर दोघांनीही मिळून उशीने तोंड दाबून दीप्तीची हत्या केली. हत्येनंतर दोघेही फरार झाले. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा पोलिसांना दीप्तीचा मृतदेह आढळून आला तेव्हा चंदा वडिलांसमोरच धाय मोकळून रडत होती. यामुळे कुणालाही तिचा संशय आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.. विखे पाटलांचा राजीनामा आणि मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची मागणी

73 शिक्षकांची हकालपट्टी; आणखी 2,217 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार, शिक्षण क्षेत्रात खळबळ

Indian Railways Ticket : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकीट बुकिंगचा नियम बदलला, वाचा संपूर्ण प्रोसेस

Indian Railways : देशातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन स्टेशनदरम्यान धावणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली नवी अपडेट

काँग्रेसची जोरदार मुसंडी, झेडपी-पंचायत समिती निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी भाजपचा पराभव; किती जिल्ह्यांत सत्ता?

SCROLL FOR NEXT