Ganpat Gaikwad Driver Arrested Saam TV
क्राईम

Ganpat Gaikwad Driver Arrested: गणपत गायकवाडांच्या वाहन चालकाला अटक; मुलगा अद्याप फरार

Crime News: भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या वाहन चालकाला अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अजय दुधाणे

Ranjit Yadav Arrested:

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. गणपत गायकवाड प्रकरणातील आरोपी रणजीत यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. रणजीत यादव गणपत गायकवाड यांचा वाहन चालक आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर तो फरार होता. पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतलं आहे.

सदर प्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड देखील फरार आहे. पोलीस आमदारांच्या मुलाचाही शोध घेत आहेत. गणपत गायकवाड यांचा चालक रणजीत यादवला उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. उल्हासनगर न्यायालयाने त्याला 14 तारखेपर्यंत दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावलीये.

गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात जेवण सोडलं

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते कळवा पोलीस ठाण्यात अटकेत आहेत. अशात गेल्या ३ दिवसांपासून ते जेवत नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

घडलेल्या प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांनी अन्न त्याग केला आहे. त्यामुळे तज्ज्ञांकडून त्यांचे समुपदेशन होण्याची शक्यता वर्तवली जातेय. गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली होती. आता वाहन चालकाला अटक केल्याने ही संख्या ७ वर पोहचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT